Home उत्तर महाराष्ट्र आंबे गावी आंबा शेतीशाळा उत्साहात…!

आंबे गावी आंबा शेतीशाळा उत्साहात…!

112

नाशिक :- (राम खुर्दळ याजकडून)
पेठ तालुक्यातील आंबे गावी आंबा शेतीशाळा संपन्न झाली,यावेळी मा.श्री. मोहन वाघ साहेब, विभागिय कृषि सहसंचालक नाशिक, मा. श्री. विवेक सोनवने साहेब जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक , मा. गोकुळ वाघ उपविभागिय कृषि अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉर्टसप योजने अंतर्गत मौजे आंबे ता. पेठ जि. नाशिक या गावात आंबा पिकाच्या शेतीशाळेचा दुसरा वर्ग घेण्यात आला.

या शेतीशाळेच्या वर्गात सहयाद्री अँग्री कंपनीचे शास्त्रज्ञ श्री धोंडे सर यांनी निर्यातक्षम आंबा उत्पादन विषयी मार्गदर्शन केले. तसेच आंबा पिकावरील कीड व रोग नियंत्रणाविषयी माहिती श्री अविनाश खैरनार तालुका कृषि अधिकारी पेठ यांनी दिली.

आंबा पिकासाठी घरच्या घरी बोर्डो-पेस्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक श्री बाळासाहेब शेलार, मंडळ कृषि अधिकारी पेठ, श्री अनिल भोर कृषि पर्यवेक्षक , श्री दिपक वाघेरे कृषि सेवक यांनी करून दाखविले. सदर शेतीशाळेचा वर्ग आंबा उत्पादक प्रगतशिल शेतकरी श्री दत्तात्रय गोविंदा गायकवाड यांच्या शेतात
घेण्यात आला. या शेतीशाळेसाठी गावातील शेतकरी सरपंच श्री मेघराज राऊत, श्री ढवळू वाघमारे, तानाजी भसरे, जनार्दन गायकवाड, देविदास गायकवाड, रामा वाघ, मोहन गावित, लक्ष्मण चौधरी व आंबे गावातील शेतकरी उपस्थित होते.