भावेशच्या गुणांचा अवलंब समाजातील युवकांनी करावा – किशोर दर्डा
यवतमाळ – येथील आनंद फायनान्स कंपनीच्या वाहनाला शेलू नजीक अपघात होऊन यात यवतमाळ येथील भावेश सुशिल भरुट (जैन) हे दगावले असून ईतर 4 जणांना किरकोळ जखमी झाले. मृतक भावेश सुशिल भरुट वय 22 यांच्या पार्थिवावर आज पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नागपूर येथील साक्षगंधाच्या कार्यक्रमाला जात असतांना भावेश भरुट हे मारोती सिहाज या वाहनातून यवतमाळ वरुन नागपूरकडे जात असतांना सेलु जवळील भोयर कॉलेज नजीक रस्ता थोडा दबुन असल्याने भावेश भरुट यांचे नियंत्रण सुटून समोरुन येणार्या आयशर ट्रक ला जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. रस्त्यालगत कटड्याला जावून ही गाडी धडकली. या अपघातातील जखमींना अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. या मध्ये भावेश सुशिल भरुट हा 22 वर्षीय युवक जागीच मृत्यूमुखी पडला. ईतर जखमी 4 जणांना सावंगी मेघे व नागपूर सिम्स हॉस्पीटल मध्ये रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
आज दि. 5 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथील पांढरकवडा रोडवरील हिंदु मोक्षधामात चि. भावेश भरुट वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पेशवे प्लॉट येथील त्यांच्या निवास्थानी गुरुदेव अक्षय ऋषिजी म. सा., अमृत ऋषीजी म. सा., गितार्थ ऋषीजी म. सा., आ. मदन येरावार, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी सांत्वनापर भेट दिली. सकल जैन समाजाचे आधार स्तंभ किशोरबाबु दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. या प्रसंगी बोलतांना किशोरबाबु दर्डा म्हणाले की, सकल जैन समाजातील उत्कृष्ट अष्टपैलू युवा व्यक्तीमत्व आज समाजातून हरविले आहे. मनमिळावू उमद्या नेतृत्वाचे चि. भावेश चे गुण युवकांनी आत्मसात करावे तसेच समाजाच्या उत्थानासाठी नेतृत्व उभे करावे असे विचार करुन आपली शोकसंवेदना व्यक्ती केली. या प्रसंगी जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, भारतीय जैन संघटनेचे प्रकाशचंदजी छाजेड, विजय बुंदेला, महेंद्र सुराणा, गौतम कटारिया, राजेंद्र गेलडा, संजय झांबड, भवरीलाल बोरा, संजय नखत, जवाहर बोरा, नरेंद्र कोठारी, अमोल येरावार, किशोर बोरा, महेंद्र बोरा, रविंद्र बोरा, सह शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शोकसभेचे संचलन अशोक कोठारी यांनी केले.