Home यवतमाळ 9 नोव्हेंबर पासून यवतमाळात श्रीमद् भागवत कथा

9 नोव्हेंबर पासून यवतमाळात श्रीमद् भागवत कथा

182

यवतमाळ – येथे येत्या दि. 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हंेंबर पर्यंत श्रीमद् भागवत कथेचे भव्य आयोजन स्थानीय नवजीवन मंगल कार्यालयात येथील भूत कुटूंबीयांद्वारे करण्यात येत आहे.
भागवत कथा, पुज्य अनंत श्री. विभूषित महामंडळेश्‍वर स्वामी चिदंबरानंद महाराज हे रसाळ वाणीने सादर करतील. कथेची वेळ दि. 9 नोव्हेंबर दुपारी 2.30 वाजे पासुन सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. पहिल्या दिवशी सकाळी 9.30 वाजता श्री गोवर्धननाथजी हवेली जवळून कलश शोभायात्रा निघून नवजीवन मंगल कार्यालयात कथा आरंभ होईल. कथा पर्वात गुरुवार दि. 10 रोजी देवर्षी नारद यांचा पुर्व जन्म, शुकदेव आगमन, शुक्रवारी दि. 11 रोजी सती चरित्र ध्रुव चरित्र, अजामिल कथा, शनिवारी दि. 12 रोजी प्रल्हाद चरित्र श्रीराम व श्री कृष्ण जन्मोत्सव, रविवारी दि. 13 ला बाललीला व गोवर्धन पूजा, दि. 14 नोव्हेंबर सोमवारी गोपी गीत, कंस वध, भ्रमर गीत, रुक्मिणी विवाह आणि प्रसंग सादर करतील. अंतिम दिनी मंगळवार दि. 15 नोव्हेंबरला कथा सकाळी 9 वाजताची आहे. कथेची समाप्ती झाल्यावर हवन व पुर्णाहुती होईल. या सत्संगाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक रामस्वरुपजी भूत तथा सौ. सीतादेवी भूत व परिवाराने केले आहे.