शस्ञ अधिनियमाअंतर्गत कारंजा येथे पोलिसांची कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:- दि. ७/११/२०२२ रोजी गूप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, मंगळवारा कारंजा येथे
एक ईसम त्याचे हातामध्ये लोखंडी मियान नसलेली तलवार त्याचे हातामध्ये घेवून घरासमोर
सार्वजनिक रस्त्यावर घेवून फिरत आहे. अशी गोपनिय माहीती मिळाल्यावरून पोउपनि/बि.सी.
रेघीवाले, ना.पो.कॉ/ उमेशकुमार बिबेकर ब.न.पो.कॉ. नितीन पाटील ब.न. ३३८ पो.कॉ.अमीत भगत ब.
न. ३११ पो.कॉ. गजानन शिंदे ब.न. १४०९ पो.स्टे. कारंजा शहर हे व पंचासह मंगळवारा कारंजा येथे
घटनास्थळी रवाना होवुन मंगळवारा येथे सिध्दार्थ भानुदास तायडे यांचे घरा घरासमोर जावुन पाहले असता एक ईसम मियान नसलेली तलवार घेवून आरडा ओरड करून हातातील तलवार घेवुन फीरवित होता. त्यास पोलीसाची चाहुल लागताच रस्त्यावरील मोरोती सुझुकी व्ही.डी.आय.पाढं-या रंगाच्या जिचा क्रमांक एम.एच.०४ जी.जे. १८०४ असुन सदर ईसम हा कारमध्ये जावुन कार सुरू करून पळुन जात
असतांना त्यास पंचा समक्ष पो.स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्यांने त्याचे नाव सिध्दार्थ भानुदास तायडे वय ३८ वर्ष रा. मंगळवारा कारंजा लाड जि.वाशिम असे सांगितले त्याला त्याचे ताब्यातील मियान नसलेली तलवार कुठे ठेवली याबाबत विचारपुस केली असता त्यांने कार मधुन सदर ची तलवार बाहेर काढुन दाखविली सदरची तलवार पंचा समक्ष निरीक्षण केले असता तलवारीची लांबी ३२ इंच असुन त्याची मुठ ४.११ इंच आहे तलवारीच्या पात्याची रुंदी ३.३ इंच
असुन टोकाकडे निमुळती असुन टोक टोकदार आहे. तलवार डबल धार असुन मुठी पासुन पात्याची
लांबी २७ इंच आहे. अशा वर्णनाची तलवार ताब्यात घेवून त्याला सदर तलवार बाळगण्याचे शस्त्र
परवाना धारक आहे का असे विचारले असता त्यांने माझेकडे कोनताही शस्त्र परवाना नाही असे सांगतल्याने नमुद आरोपी ताब्यात घेवून एक तलवार किंमत ५००/-रु. व मोरोती सुझुकी व्ही.डी.आय.पाढं-या रंगाच्या जिचा क्रमांक एम.एच.०४ जी.जे.१८०४ किंमत अं ३,००,०००/-रू. असा
एकुण ३,००,५००/-रु.चा.माल ताब्यात घेतला. नमुद आरोपी नामे सिध्दार्थ भानुदास तायडे वय ३८
वर्ष रा. मंगळवारा कारंजा लाड जि.वाशिम याचे कृत्य कलम ४.२५ आर्म अॅक्ट सहकलम ३५ बि.पी.
अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयातील आरोपी यास अटक करण्यात
आले असुन सदर गुन्हयाचा तपास पो.नि. ए.एस. सोनोने यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/बि.सी.
रेघीवाले पो.स्टे. कारंजा शहर हे करीत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206