Home यवतमाळ आसेगाव देवी ग्रामपंचायतला आयएसओ चा दर्जा…!

आसेगाव देवी ग्रामपंचायतला आयएसओ चा दर्जा…!

138

नवीन वर्षातील तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत…!

यवतमाळ:- बॉक्स(ग्रामपंचायत आयएसओ करण्याचे पूर्ण श्रेय हे आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सचिव यांना जाते आसेगाव देवी च्या विकासासाठी जनतेच्या विश्वासाला जाऊ देणार नाही. ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्याने शक्य झाले. पुढेही गावाच्या विकासासाठी सर्व मिळून कार्य करत जाऊ असे सरपंच सचिन चव्हाण यांनी म्हटले)

आसेगाव देवी हे गाव तालुका मुख्यालय पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आसेगाव देवी या गावी नवनियुक्त सरपंच सचिन चव्हाण यांनी मौलिक भूमिका बजावलेल्या आसेगाव देवी येथील ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे कमी काळात सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत नामांकन प्राप्त झाले.
ऑडिटर राहुल इंगळे व रोशन महले सर यांनी ग्रामपंचायतला आय एस ओ प्रमाणीत करून तसे प्रमाणपत्र ग्रामपंचायत दिले आहे . ग्रामपंचायत सरपंच सचिन चव्हाण,उपसरपंच निखिल वेळूकर ग्रामसेवक ओंकेश कावलकर, सदस्य सुभाष ताबड ,भोपाल लुणावत,पद्मा खोडे,गिरजा मडावी, ताई कोल्हे,सुनिता कांबळे यांच्या उपस्थितीत सदर प्रमाणपत्र देण्यात आले आहे .
सरपंच सचिन चव्हाण यांच्या हातात ग्रामपंचायतची धुरा आल्यापासून य गाव विकासाच्या नवनवीन संकल्पना अमलात आणल्या जात असून व गावकऱ्यांचे सहकार्यातून गाव विकासाचचा प्रयत्न केला जात आहे .याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांसाठी जलद व योग्य प्रकारे सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी ग्रामपंचायतकडून वेळेत व यथायोग्य कामे होत असल्याने दप्तर दिरंगाईला बगल देण्यात यश आले आहेत. या बाबीची दखल घेत शासकीय स्तरावरून ऑडिटर श्री राहुल इंगळे रोशन महलले यांच्यामार्फत ग्रामपंचायत संपूर्ण ऑडिट करून केले असता. सदर ग्रामपंचायत योग्य ठरल्याने बाबुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी या ग्रामपंचायत आय एस ओ मानांकन मिळाले आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायतला बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इतरही ग्रामपंचायत ने दखल घेण्याचे आवाहन सरपंच सचिन चव्हाण यांनी केले आहे.