Home यवतमाळ हुशेनी सिमेंट व अंबुजा सिमेंट कंपनी तर्फे बांधकाम ठेकेदारांना मार्गदर्शन

हुशेनी सिमेंट व अंबुजा सिमेंट कंपनी तर्फे बांधकाम ठेकेदारांना मार्गदर्शन

67

 

यवतमाळ ः शहरातील अंबुजा कंपनीचे अधिकृत वितरक हुशेनी सिमेंट ट्रेडर्स संभाजी नगर येथे बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांना अंबुजा सिमेंट तर्फे मार्गदर्शन शिबीर देण्यात आले.
या मध्ये सिमेंट, रेती व खडी याचा वापर बांधकाम कशा पद्धतीने करावा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अत्याधुनिक सिमेंट व ते बनविण्यासाठी लागणारे कच्चे मटेरियल आणि सिमेंटचा दर्जा कसा असावा या बद्दल सुद्धा या मार्गदर्शन शिबीरात माहिती देण्यात आली. अत्याधुनिक सिमेंट व त्यापासून बनविलेले कॉंक्रीट याचा कसा वापर करावा व त्याचे बांधकामात होणारे फायदे यांची माहिती कंपनीचे अभियंता सागर मांडवकर यांनी दिली. या मार्गदर्शन शिबीराला ठेकेदार मिस्त्री, कामगार मोठ्या संख्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हुशेनी सिमेंट चे संचालक अमर भारमल यांनी केले.