Home बुलडाणा अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले तहसीलदार सावंत यांची धाडसी कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले तहसीलदार सावंत यांची धाडसी कारवाई

171

सिंदखेड राजा

भगवान साळवे
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांना चाप बसावा यासाठी महसूल विभागाने धाडसी मोहीम सुरू केली असून सिंदखेडराजा शहरात अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वतःधाडसी कारवाई करत रेती वाहतूक करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियामध्ये चांगलीच दहशत पसरली आहे

चोरी छुपे अवैध रेती वाहतूकीला लगाम लावावा यासाठी तहसीलदार सुनील सावंत रात्री बेरात्री मोटारसायकल किंवा खाजगी वाहनात फिरून रेती माफियांवर करडी नजर ठेवत आहे शुक्रवारला दुपारी शहरातून अवैध रीती वाहतूक करणारे एम एच 28 ई 8490 या क्रमांकाचे ट्रॉली असलेले विना नंबरचे ट्रॅक्टर तहसीलदार सुनील सावंत यांनी पकडुन ट्रॅक्टर चालक पुंजाजी कोरडे यांना जवाब घेतला तेव्हा त्याने त्यांनी ट्रॅक्टर मालकाचे नाव खालील कुरेशी असल्यास सांगितले त्यावरून तहसीलदार सावंत यांनी पंचनामा करून कारवाई केली यावेळी नायब तहसीलदार प्रवीण वराडे महसूल विभागाचे कर्मचारी विकार शेख पंजाबराव ताठे आदी उपस्थित होते महसूल विभागांनी राबवत असलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत ना तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी रात्री फिरून 5 ब्रास चे टिप्पर पकडुन त्याच्यावर धाडसी कारवाई केली होती त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियमध्ये दहशत पसरली आहे

रात्री विविध वाहनांमध्ये फिरून तहसीलदार सावंत करतात कारवाई रेती माफिया मध्ये भरली हुडहुडी
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या बसवा यासाठी तहसीलदार सुनील सावंत हे रात्री मोटरसायकल पासून ते भाडोत्री वाहन घेऊन रात्रभर फिरून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर क** कारवाई करत आहेत त्यामुळे रेतीमाफी यामध्ये चांगली दहशत पसरली आहे दरम्यान अवैध रेती वाहतूक करताना कोणी आढळल्यास फोन द्वारे माहिती द्यावी असे आवाहन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले आहे