खामगाव : – दोघे पती – पत्नी कोथळी येथून आठवडी बाजार करून खामगाव रस्त्याने दुचाकीने जात असतांना महिलेचा साडीचा पदर गाडीच्या चाकात अडकला व महिला खाली पडली होती या घटनेत महिला गंभीर जखमी झाली होती उपचारासाठी या महिलेस औरंगाबाद येथील रूग्णालयात भरती करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना महिलेचा आज दुर्देवी मृत्यु झाला असल्याची माहिती मिळाली ही घटना 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती ,
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश आप्पा सदावर्ते व साधना सदावर्ते , राहणार पिंपळगाव राजा, तालुका खामगाव, हे दोघे एम. एच. 28 8582 या क्रमांकाच्या मोटर सायकल वर खामगाव ते कोथळी रोडने आठवडी बाजार करून जात होते या वेळी सदर महिलेचा पदर मोटर सायकल च्या चाकात अडकून, महिला खाली पडली होती या घटनेत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. होती उपचारासाठी औरंगाबाद येथील एपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, होते उपचार सुरू असताना सदर महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला
या संदर्भात बोराखेडी पोलिस ठाण्यात महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.