Home विदर्भ पत्रकार संरक्षण समितीची वर्धा जिल्हा कार्यकारिणी गठीत.!

पत्रकार संरक्षण समितीची वर्धा जिल्हा कार्यकारिणी गठीत.!

172

जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सत्तारभाई शेख यांची तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी संदीप रघाटाटे यांची वर्णी

वर्धा : – पत्रकार संरक्षण समितीच्या आजच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते जिल्हा कार्याध्यक्ष पदावर देवळी येथील ज्येष्ठ पत्रकार सत्तारभाई शेख यांची तर उपाध्यक्ष पदावर सालोड येथील पञकार संदीप रघाघाटे यांची नियुक्ती करण्यात आली.
पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थानिक विश्राम गृहात बैठक पार पडली. यावेळी पत्रकारांच्या समस्या व त्यांना येणाऱ्या अडीअडचणी यासंदर्भात साधकबाधक चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात पत्रकार संरक्षण समिती वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष पदी देवळी येथील ज्येष्ठ पत्रकार सत्तारभाई शेख यांची तर उपाध्यक्ष पदी सेलू येथील पत्रकार संजय धोंगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यासोबतच वर्धा शहर अध्यक्ष पदी बाळा चतारे, ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षपदी सालोड येथील पत्रकार संदीप रघाटाटे, जिल्हा सचिव योगेश कांबळे देवळी, सहसचिव सतिश काळे हिंगणघाट, इकबाल शेख आर्वी, कोषाध्यक्ष प्रमोद भोजणे आष्टी, सहकोषाध्यक्ष प्रकाश झांझडे देवळी यांची तर सदस्यपदी सचिन धानकुटे सेलू, संजय बोंडे वर्धा, नितीन चरडे पुलगांव, राहुल मुन वर्धा, प्रा. मेघश्याम ढाकरे समुद्रपूर, प्रविण करोले आष्टी यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून प्रशांत आजनकर वर्धा, वर्धा तालुकाध्यक्ष पदावर संजीव उर्फ बाळासाहेब वाघ, सेलू तालुकाध्यक्ष पदावर गजानन जिकार, देवळी तालुकाध्यक्ष पदावर पंकज गादगे, देवळी शहर अध्यक्ष पदावर गणेश शेंडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार संरक्षण समिती वर्धा जिल्ह्याच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे, जिल्हा कार्याध्यक्ष सत्तारभाई शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सदर बैठकीला वर्धा शहर तसेच जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.