घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे
आज घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान व इतर मूर्ती पुनःस्थापना सोहळ्याला शनिवारी (दिं.26) दुपारी भेट दिली.
यावेळी समर्थवंशज भूषण स्वामी महाराज यांच्याशी ग्रामस्थांसमवेत चर्चा केली, आणि कृतज्ञता सन्मान सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही त्याची खंत व्यक्त केली. मंत्री असतांना जांबसमर्थ गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला व यानंतरही आपण या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न करू त्यासाठी संस्थान व ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
यांनी शाम नाना उढाण यांच्या ऑफिस ला भेट दिली आस्था त्यांचा सत्कार करतांनी. शाम नाना उढाण व कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य यांनी सत्कार केला.
मा. माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचा जांब फाटा या ठिकाणी लोणीकर साहेब यांचा भाजप कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी अंकुशराव बोबडे, शामनाना उढाण, पंचायत समिती सदस्य सुशील तांगडे, सरपंच बाळासाहेब तांगडे, संजय तौर , शिवाजीराव कंटूले, मोहन तांगडे, विलास बन्सीधर तांगडे, युवराज आर्दड, दत्ता तांगडे, दादू तांगडे रामेश्वर गरड, रामेश्वर काळे,मोहन तांगडे, गणेश चव्हाण, अविनाश चव्हाण, तुकाराम नवल, संभाजी तांगडे,मंच्छीद्र आर्दड,गौरव तांगडे, अनिल तांगडे, प्रविण तांगडे, दत्ता तांगडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.