प्रतिनिधी ( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही : – भरधाव वेगात चिखली वरून घराकडे दे राजा येथे जात असतांना अचानक मोटार सायकल एका बाभळीच्या झाडावर आदळली आणि त्यामध्ये २३ वर्षांय विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाला ही घटना २६ नोव्हेंबर रोजी मेरा खुर्द येथील फाट्यावर घडली .
देऊळगाव राजा येथील रहिवाशी असलेले सचिन शत्रूघन बोरूडे वय २२ वर्ष हे कामा निमित्त मोटार सायकल क्र एम एच २८ बी आर ८२७३ वे चिखली येथे गेले होते . काम आटोपून घराकडे दे राजा कडे जात असताना अचानक भरधाव वेगातील मोटारसायकल रोडच्या बाजूला एका बाभळीच्या झाडाला जावून धडकली.आणि अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना मेरा खुर्द फाट्या नजिक जि.प.उर्दु हायस्कूल जवळ घडली .या घटनेची माहिती शेख कौसर यांनी पोलीस स्टेशनला दिली माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार पोफळे, झिने यांनी घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा केला