Home महत्वाची बातमी सर्व मतिमंद व्यक्तींना आयुष्यभर मदतीची व आधाराची गरज असते. सौम्य मतिमंदत्व व...

सर्व मतिमंद व्यक्तींना आयुष्यभर मदतीची व आधाराची गरज असते. सौम्य मतिमंदत्व व शैक्षणिक मागासलेपण असलेल्या व्यक्तींमध्ये आर्थिक स्वावलंबन काही प्रमाणात येऊ शकते”

183
यवतमाळ – सकाळीच डोगरे भाऊ यांचा कॉल आला की, करण जोगदंड हा वस्तीगृहातून पडून गेला आणि मी त्याचा शोध घेत आहे. मग मी लगेच त्याला शोधण्यासाठी निघालो संपूर्ण शहर फिरून झाले परंतू कुठेही करणचा पत्ता लागत नव्हता…करण हरवला म्हणून अशी बातमी गावाकडे पण पोहोचली आणि गावाकडून अनेक कॉल मला येणे सुरु झाले…
पोरगा कुठे गेला? काय झाले काही कळायला मार्ग नव्हता…. तत्पूर्वी करण हा यवतमाळ येथील गतिमंद शाळेतील विद्यार्थी त्याची परीस्थिती अत्यंत बिकट याला काही तरी जीवनात करता यावे या उद्देशाने त्याला गतिमंद शाळेत टाकले आणि गेल्या चार वर्षापासून तो त्या शाळेत माणुसकीचे धडे घेत होता मी निव्वळ त्याचाच विचार करत होतो.अचानक माझ्या गावाच्या प्रमोद लसणकर याचा कॉल आला त्याला मी सकाळीच वाघापूर नक्यावर भटलो होतो आणि आपल्या गावातील करण जोगदंड हा शाळेतून पळून गेला असे सांगितलेले होते. त्याने पण आपल्या परीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व मला थोडया वेळातच त्याचा कॉल आला की करण हा ITI college कडे आहे.मग मी लगेच तिकडे निघालो पण तसे त्याला पूर्ण माहिती नव्हती पण तो सतत कॉल करुन संबंधित व्यक्तीकडून तो माहिती घेत होता. तेव्हा त्यांनी सांगितले की त्याला अनिल बावणे या मुलांनी माहिती दिली. मग मला आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्त्या सपनाताई भरुट यांचा कॉल आला व त्यांनी मला सांगितले की त्यांना डॉ.चव्हाण यांचा कॉल आला व त्यांनी सांगितले की करण हा धामण गाव रोड वर सापडला व तो शहर पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित आहे. त्यांना ही माहिती एका ग्रुप वरुन माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे माझा नंबर नसल्यामुळे त्यांना सपनाताई कडे नंबर मागितला तर त्यांनी मला लगेच कॉल करून सांगितले की लोहीचा कोणी तरी करण नावाचा मुलगा शहर पोलीस स्टेशन मध्ये आहे… पुन्हा माझी गुंता गुंत वाढत होती माझे टेंशन पण वाढतं होते. कारण करण जोगदंडचा प्रवेश मीच केला होता. करण अत्यंत गरीब असुन तो गतिमंद आहे.व त्याला नेहमी फीट येतं असते… त्यामूळे मला चिंता वाटत होती. त्याला फीट आली नाही पाहिजे याच गोष्टीच्या विचारात मी शहर पोलीस स्टेशन मध्ये पोहचलो आणि तिथे करण नव्हता तेव्हा तेथील कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करण विषय माहिती दिली असता साहेबांनी मला सरळ SDPO कार्यालय कडे पाठविले मी त्यांना धन्यवाद करुन बाहेर आलो की लगेच यश किर्दक व त्याचा मित्र कादिर शेख मदतीसाठी धावून आला आम्ही लगेच एसडीपीओ कार्यालय धामणगाव रोड निघालो रस्त्यांनी जात असताना माझ्या मोबाईल वर करणच्या बाबतीत अनेक कॉल येत होते आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते… त्याच कशमकश मध्ये मी SDPO कार्यालया जवळ पोहचलो तर एक पोलीस बांधव आणि तिन चार कॉलेज मधील मुले करणला घेऊन एका कॅन्टीनमध्ये त्याला भूक लागली म्हणून नाश्ता देत होते… मी गेलो आणि त्यांना सांगितले की हा माझ्या गावातील मुलगा आहे आणि मी याला सकाळ पासून शोधत आहे… तेव्हा त्यांनी माझ्या स्वाधीन करणला दिले तेव्हा लगेच नंददीप फाऊंडेशनचे आदरणिय संदीप शिंदे तिथे आले त्यांना कोणी तरी माहिती दिली की एक गतिमंद मुलगा ITI कॉलेज रोडवर फिरत आहे… तेव्हा ते पण त्या ठिकाणी पोहचले त्यांना लगेच लोहरा ग्रामीण मधून कॉल आला की या मुलाच्या शाळेतील कर्मचारी शिक्षक Missing Report देण्यासाठी आले मग शिंदे भाऊंनी त्याला व कादिर शेख माझ्या सोबत असलेल्या यशाच्या मित्राला घेतले व आम्ही थेट लोहारा ग्रामीण पोलीस स्टेशनला निघालो गावाकडील अनेक कॉल येतं होते. त्यांना प्रत्येकाला मी सांगत होतो की करण सापडला म्हणून त्यांना पण खूप आनंद झाला.आम्ही तेथे पोहचलो आणि लगेच शाळेतील कर्मचाऱ्याच्या स्वाधीन करून दिले… या सर्व गोष्टीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या चार मुलाचे मानावे तेवढे आभार कमीच आहे… खरा माणुसकीचा धडा त्यांच्या कडून शिकण्या सारखा…