Home मराठवाडा मैत्रेय प्रकरणी गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने मुंबई शेषण कोर्टात वकिलपत्र दाखल,परतावा मिळण्याच्या आशा...

मैत्रेय प्रकरणी गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने मुंबई शेषण कोर्टात वकिलपत्र दाखल,परतावा मिळण्याच्या आशा पल्लवीत

184

 

जालना -लक्ष्मण बिलोरे

मैत्रेय उद्योग कंपनीने गुंतवणुकदांची फसवणूक केल्या प्रकरणी मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनीधी संघटनेच्या मार्फत मैत्रेय उद्योग कंपनीत केलेली गुंतवणुक परत मिळविण्यासाठी मुंबई शेषण कोर्टात आज ता.२८,सोमवार रोजी ॲड.संतोष भटगुणानी यांच्याकडे वकिलपत्र दाखल केले आहे.

मैत्रेय उद्योग समुहाने १९९८ साली ठाण्यात कंपनीचे ऑफीस सुरू केले.भरघोष कमिशन देण्याचे आणि गुंतवणुकदारांना परताव्याची मोठी रक्कम देण्याचे अमीश दाखवून राज्यभरातून लाखों गुंतवणूकदारांकडून कोट्यावधींची माया जमविली.२०१६ साली मैत्रेयने गाशा गुंडाळला त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.गुंतवणूकदारांना त्याना त्यांचा कष्टाचा पैसा परत मिळावा यासाठी गुंतवणूकदार प्रतिनिधी संघटीत झाले.गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता कदम यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई शेषण कोर्टात वकीलपत्र दाखल करण्यात आले. ॲडव्होकेट श्री संतोष भटगुणाकी यांना मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधी संघटना यांचेमार्फत मैत्रेय गुंतवणूकदारांचा परतावा मिळण्यासाठी वकीलपत्र देण्यात आले.याप्रसंगी मैत्रेय प्रतिनिधी व गुंतवणूकदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संगीता कदम, उपाध्यक्ष उदय संख्ये,सचिव सुमन कदम , संघटनेचे सदस्य विष्णू संकपाळ , रामराव मोरे ,डॉ.सुचित दुसाने , बापूराव डोके, अमिता बारी, जयंती सावे, विद्या सावंत, हेमांगी आचरेकर , संध्या ओरा , संतोष तेली , प्रभाकर मेहेर उपस्थित होते. संबंधित वकिल पत्र मुंबई सेशन कोर्टात दाखल करण्यात आले आणि न्यायालयातर्फे ते आजच स्विकारण्यात आलें पुढील कारवाईसाठी १४डिसेंबर २०२२ ही तारीख देण्यात आली आहे.
अवघ्या सहाच महिन्यात या संघटनेच्या वतीने गुंतवणूकदारांच्या न्याय हक्कासाठी कोर्टात स्वतंत्र वकिल देण्यात आले आणि परताव्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलण्यात आले.यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधान व्यक्त होत असून परतावा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेचे अभिनंदन करण्यात येत .