Home विदर्भ मंत्रालय येथे दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ...

मंत्रालय येथे दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विर्दभ प्रदेश प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न

223

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती / भातकूली-: २९ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालय येथे दुपारी ४.३० वाजता मा. दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती (विदर्भ प्रदेश) चे प्रतिनिधी समवेत मंत्रालयातील दालन क्रमांक २३८ मध्ये सरळ खरेदी व नोकरी विषयक समस्या बाबत बैठक झाली.९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती कडून मनोज तायडे, माणिक गंगावणे,रविंद्र बद्रीया,रवी पाटील रंजवे,यांनी दिलेल्या निवेदनानुसार ही बैठक पार पडली. या बैठकीत सरळ खरेदी व नोकरी विषयक अशा दोन्ही मुंद्यावर माणिक गंगावणे मनोज तायडे,बबलु दुर्गे यांनी प्रभावी पणे सखोल चर्चा केली.व आता सदर प्रकरण मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल.
या बैठकीस मा.अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग दिपक कपुर,असिम गुप्ता सचिव मदत व पुनर्वसन विभाग,क.सु.वेमुलकोंडा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती,रश्मी देशमुख अधिक्षक अभियंता अमरावती,अमोल फुंदे उपसचिव जलसंपदा विभाग मुंबई,अतुल कपोले मुख्य अभियंता मंत्रालय मुंबई,राजेंद्र मोहिते सचिव जलसंपदा मंत्रालय मुंबई,अभय पाठक मुख्य अभियंता वि. प्र. अमरावती,गणेश केथले जलसंपदा विभाग,आमदार प्रतापअडसड धामणगाव विधानसभा मतदारसंघ,तसेच दुरदृष प्रणाली व्दारे मा. कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर,विभागिय आयुक्त अमरावती, विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी,सचिव इतर अधिकारी, या बैठकीस उपस्थित होते.तसेच विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती शिष्टमंडळाचे पदाधिकारी माणिक गंगावणे,मनोज तायडे,बबलू दुर्गे, रवि बद्रीया,शिवदास पाटील ताठे,उमाकंत अहिरराव,महादेव निंबोकार, विकास राणे,रामेश्वर गालट, नितीन मलमकार, डॉ भगवान पंडित, महादेव ठाकरे,मनोज पुनसे,गजानन सालोकार, राजकुमार कडू, अतुल महल्ले, गोपाल मोरे,बाळासाहेब दाते, प्रकाश डोंगरे, नंदु वानखडे,राजू जाधव,प्रकाश वानखडे उपस्थित होते.