पालकमंत्र्यांचा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद
मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात तिनशे रुग्ग्णांची शस्त्रक्रिया
यवतमाळ दि, ३० नोव्हेंबर, जिमाका:- अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडुन उपचार करुन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे असतात. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढून आपल्या जिल्ह्यातिल नागरिकांच्या डोळ्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. लहाने आपल्या जिल्ह्यात आलेत. आपण कुणीही देव पाहिला नाही, मात्र तात्याराव लहाने आणि रागिणी पारेख यांच्या रुपात आज देव पहायला मिळाला, असे उद्गार अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.
स्व. वसंतराव नाईक वैद्यकिय महविद्यालयात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झालेल्या रुणांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख, डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांची चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटिल उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले, डॉ. तात्याराव लहाने यांच्या हातात जादु आहे. त्यांनी आतापर्यंत लाखो शस्त्रक्रिया करुन रुग्णांना नवी दृष्टी दिली आहे. मागिल वर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यात १ हजार शश्त्रक्रिया त्यांनी केल्या होत्या. यावर्षी शिबिरासाठी पाठपुरावा करुन त्यांना आमंत्रित केले. त्यांच्या सारख्या निष्णात डॉक्टरांकडुन आपल्याला सेवा मिळत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे.
डोळे हा अतिशय नाजुक भाग आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्ग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी. डिसेंबर महिन्यात सर्व आजारांसाठी तपासणी शिबिर आयोजित करणार आहे. नागरिकांनी त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले. त्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपुस करुन वेळेवर औषध घेण्यासही सांगितले.
यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी डोळ्याची निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले.डीन मिलिंद फुल पाटिलयावेळी डॉ. सुरेंद्र भुयार यांची पुर्ण टीम, श्रीधर मोहोड, हरिहर लिगणावर, पराग पिंगळे, कलिंदा ताई पवार, मनोज सींघी, उत्तम ठवकर, नामदेव जाधव, राजू दुधे, विकास क्षिरसागर, घनश्याम नगराळे, शेखर राठोड, अमोल राठोड, बंडू काने रमेश जाधव, अनिकेत खडसे, बबनराव इर्वे, विजय निमकर, सुरेखा राठोड, विशाल गनात्रा, श्याम चव्हान, गजानन इंगोले, विनोद जाधव, सुनील सिरकर, विशाल इवडे, प्रभू जाधव, विजय राठोड, श्याम चव्हान, नितीन भास्कर, पंकज इंगोळे, निरंजन राठोड, पवन अराठे, नीलेश बेलोकर, श्याम थोरात, पद्माकर काळे, निमिषा पोघत,दिलीप चव्हाण, जॉकी राठोड, अंकुश ठाकरे, पिंटू आंबेकर, राम वाघमारे,पिंटू आंबेकर, फारुख पत्रकर, खुर्शीद भाऊ, अकमल शेख,अरुत्न राठोड, दिनेश राठोड मनोज दातार, बजरंग बायकर, अक्षय पुसदकर, गजानन निघोट, विशाल पवार व ह्या शिबिरात मदत करण्याऱ्या शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी,दिग्रस विधानसभेतील सर्व पदाधिकारी व रुग्णसेवकांचे मनस्वी अभिनंदन व आभार