Home यवतमाळ महसूल कर्मचा-यांचे हक्काच्या पदोन्नतीसाठी आंदोलनला सुरुवात

महसूल कर्मचा-यांचे हक्काच्या पदोन्नतीसाठी आंदोलनला सुरुवात

82

 

बाभुळगाव-अमरावती विभागातील अव्वल कारकुन संवर्गमधून नायब तहसिलदार संवर्गामध्ये पदोन्नत्या होत असलेला विलंबायत अमरावती विभागामध्ये नायब तहसिलदारांची वाढती रिक्त पदे विरोधात महसूल कर्मचा-यांच्या समन्वय समितीने आंदोलनाची नोटीस विभागीय आयुक्तांना दिली असुन त्या निवेदनावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने अमरावती विभागातील पाच ही जिल्हयांतील कर्मचारी यांचे टप्पे निहाय आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

तरी याबाबत मा.विभागीय आयुक्त यांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास अमरावती विभागातील पाचही जिल्हयांतील सर्व कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यासाठी दिनांक २६ डिसेंबर २०२२ पासून बेमुदत संपावर जातील असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक नंदकुमार बुटे, जिल्हा संघटक आशिष जयसिंगपुरे यांनी दिला असून दिनांक १ डिसेंबर २०२२ पासुन सुरु झालेले आंदोलन बाभुळगाव तालुक्यांत १०० टक्के यशस्वी होत असुन सदर आंदोलनात बाभुळगाव तहसिल येथील संजय भास्करवार, सचिन तर्कटवार, विलास कुळसंगे, नरेंद्र मोहोड, सुभाष राठोड, विनोद भोंगाडे, दिपाली नाल्हे, मंगला तिडके,गोपाल कावलकर,उत्तम वाघमारे, कल्याणी शेलोडकर, सुनिता शेंडे, राजेश बोबडे, प्रफुल खंदारे, कवडु मडावी, अब्बास शेख, अविनाश भोयर यांनी सहभाग नोंदविला.