Home यवतमाळ मुर्ली ग्रामपंचायतचे सचिव नांदणे यांच्यावर 15 वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप..!

मुर्ली ग्रामपंचायतचे सचिव नांदणे यांच्यावर 15 वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप..!

112

➡️ जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांचे चौकशी करण्याचे आदेश..?

(अयनुद्दीन सोलंकी)
————————————–
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील मुर्ली ग्रामपंचायतचे सचिव एन. बी. नांदणे यांनी आदिवासी महिला सरपंचाचा गैर फायदा घेत सरपंच यांची DAC स्वतः वापरून 15 वित्त आयोगाचा पैसा ग्राम विकास अधिकारी यांच्या संगनमताने हडप केल्याचा आरोप मुर्ली ग्रामपंचायतच्या सरपंच उज्वला आत्राम, ग्रामपंचायत सदस्य आदींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलेल्या लेखी तक्रारीतुन केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांनी 23 नोव्हेंबर रोजी मुर्ली येथील प्रकरणात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना दिले आहे.

मुर्ली येथील सरपंच सौ. उज्वला पुंडलिक आत्राम या 2021 पासून सरपंच पदावर कार्यरत आहे. तेव्हा पासून ग्रामपंचायत सचिव एन. बी. नांदने यांनी सरपंच यांना DAC बाबत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच शासनाच्या विविध योजना बद्दल सुद्धा आदिवासी महिला म्हणून तिला अंधारात ठेवलं आणि सरपंच यांची DAC आजपावेतो स्वतः जवळ ठेवली असून सन 2021-22 च्या 15 वित्त आयोगाच्या निधीचे सचिवा मार्फत 15 ऑगस्ट 2022 रोजी वाचन करण्यात आले. ग्रामपंचायत सचिव नांदणे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे 16 लाख रुपये कामावर खर्च झाल्याचे सांगितले. तेव्हा सरपंच यांच्या लक्षात आले कि. सदर 16 लाख रुपये हा कोणत्या कामावर व मला न विचारता खर्च झाले.माझी संमती अथवा कोणतीही स्वाक्षरी नसतांना सदरचा निधी कसा वापरला याची चौकशी केली असता, सरपंच यांची DAC असते हे सरपंच्याच्या नंतर लक्षात आले. त्याअगोदर सचिव आणि पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी सरपंच यांच्या DAC चा वापर करून निधीचा गैरवापर केला असल्याचे निदर्शनास आले. त्या नंतर सरपंच उज्वला आत्राम आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 27 सप्टेंबर रोजी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्यानंतर सुद्धा सचिव व गट विकास अधिकारी यांनी संगणमत करून 12 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 79 हजार 416 रुपये काढल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांना विचारणा केली असता, त्यांनी उद्दट शब्दात बोलून आम्हाला तो निधी गावाच्या विकासा करिता खर्च करावा लागतो, असे सरपंच उज्वला आत्राम व सदस्य यांना सांगितले. तसेच तुम्हाला या संदर्भात सुनावणी पत्र पोस्टाद्वारे पाठविणार आहे. जर तुम्ही त्या तारखेला हजर नसले तर एक तर्फी निकाल लागेल, असे ही गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी त्यांना सांगितले. त्यांनतर 21 नोव्हेंबर रोजी सुनावणी पत्र कडून ते पोस्ट मार्फत न पाठविता ते सचिव यांच्या वॉट्सअँप वर पाठविले. सचिव एन. बी. नांदणे यांनी सरपंच यांना या बाबत कोणतीही माहिती न देता 21 नोव्हेंबर रोजी ते पत्र 11.00 वाजता सरपंच उज्वला आत्राम हिच्या वॉट्सअँप वर टाकले. परंतु त्याच दिवशी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही ग्रामस्थ यांनी याच प्रकरणा संदर्भात तक्रार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीधर पांचाळ यांच्याकडे गेले होते. त्यामुळे ते सुनावणीला हजर राहु शकले नाही. सदर प्रकरणात गट विकास अधिकारी हे पूर्णपणे सचिवांची बाजू घेत असल्याचा आरोप सरपंचानी केला आहे.
या प्रकरणासंदर्भात गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दाखल करून साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत 15 वित्त आयोगाच्या निधीच्या केलेल्या गैरपरकाराची लोकेशनसह चॊकशी न झाल्यास सरपंचच्यासह सदस्य आणि ग्रामस्थ हे घाटंजी पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आणि त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे तक्रारीतुन म्हटले आहे.
—————————————
▶️ दरम्यान, घाटंजी तालुक्यातील उंदरणी ग्रामपंचायतचे सरपंच भगवान रघुजी मेश्राम यांचे विरुद्ध सुद्धा अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अंतर्गत अपात्रते संदर्भात 17 जानेवारी 2023 रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सुद्धा उंदरणी येथील गावकऱ्यांचे लक्ष लागले असुन सदर प्रकरणात काय निर्णय लागते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
————————————–