अब्दुल कय्युम
औरंगाबाद , दि. ०१ :- दुचाकी व तीनचाकी वाहनांचे स्पेअरपार्ट चोरी करणा-या टोळीच्या मुसक्या गुन्हेशाखा पोलिसांनी आवळल्या. अटक केलेल्या टोळीकडून पोलिसांनी एका आयशर टेम्पोसह २६ लाख रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सुत्रांनी शुक्रवारी (दि.३१) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश वैâलास थोरात (वय २७, रा.रामराई रोड, वाळुज), दादाभाऊ तात्याराव खुडे (वय ३९, रा.बकवालनगर, नायगांव), नवनाथ संजय वाघचौरे (वय २२), सय्यद खलीक सय्यद रशीद (वय २७), दोघे राहणार गाढेपिंपळगाव अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बजाजनगर येथील रहिवासी प्रकाश दाजी भोसले यांचा आयशर ट्रक क्रमांक (एमएच-२०-बीटी-२४८९) चोरट्यांनी २५ जानेवारीच्या रात्री लंपास केला होता. ट्रकमध्ये बजाज वंâपनीच्या दुचाकींचे आणि रिक्षांचे जवळपास २६ लाख रूपये विंâमतीचे स्पेअरपार्ट होते.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, सहाय्यक फौजदार शेख नजीर, जमादार सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, रामदास गायकवाड, सुधाकर मिसाळ, सुधाकर राठोड, रविंद्र खरात, आनंद वाहुळ, रामेश्वर थोरात आदींच्या पथकाने वाहनांचे स्पेअरपार्ट चोरी करणारया टोळीच्या मुसक्या आवळल्या.