Home बुलडाणा देऊळगाव महीच्या शुभदा शिंगणेचे एमपीएससी परीक्षेत सुयश, मंत्रालयात सहा.कक्ष अधिकारी पदी निवड

देऊळगाव महीच्या शुभदा शिंगणेचे एमपीएससी परीक्षेत सुयश, मंत्रालयात सहा.कक्ष अधिकारी पदी निवड

227

प्रतिनिधी 🙁 रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत देऊळगाव मही येथील कु. शुभदा गणेश शिंगणे हिने नेत्रदीपक यश संपादन केले, मुंबई येथे मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर तिची निवड झाली आहे. या यशामुळे शुभदा शिंगणेचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या १०० जागांसाठी राज्यभरातून ३,२५,००० उमेदवारांनी प्राथमिक परीक्षा दिली होती. त्यामध्ये जाहीर झालेल्या निकालामध्ये ३,२३,१०० विद्यार्थी अपात्र ठरले होते. तर १९०० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन १९०० विद्यार्थ्यांपैकी १०० विद्यार्थ्यांची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी निवड झाली त्यामध्ये देऊळगाव महीच्या शुभदा गणेश शिंगणे हिने नेत्रदीपक यश संपादन केले.शुभदाने ७१ वी रँक प्राप्त करत मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचा झेंडा मंत्रालयात फडकवला आहे. देऊळगाव महीचे मुळ रहिवासी असलेले गणेश रामराव शिंगणे यवतमाळ येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागात अभियंता म्हणुन कळंब उपविभागात कार्यरत आहेत,आई कालिका गृहिणी तर भाऊ इंद्रनील बी.ई. सिव्हील पदवीधारक असुन तो पुणे येथे कार्यरत आहे. शुभदाचे प्राथमिक शिक्षण नंदुरकर विद्यालय यवतमाळ, अकरावी ते बारावीचे शिक्षण नारायणा ज्युनिअर कॉलेज हैद्राबाद येथे तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्याय चंद्रपूर येथुन शुभदाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

आईवडिलांचे नेहमीच मिळणारे अनमोल मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणा देणारे होते, सर्वप्रथम मी ध्येय निश्चित केले, आत्मविश्वास कायम ठेवला, अभ्यासाचे शिस्तबध्द नियोजन, खडतर परिश्रम आणि जिद्द या बळावर मी हे यश मिळवू शकले…. कु. शुभदा गणेश शिंगणे, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय मुंबई.