Home यवतमाळ पारवा येथील पशू वैद्यकीय दवाखाण्यासमोरील गावठाण व मंदीराच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत...

पारवा येथील पशू वैद्यकीय दवाखाण्यासमोरील गावठाण व मंदीराच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत आमरण उपोषण..!

122

➡️ उपोषण मंडपास ठाणेदार विनोद चव्हाण यांची भेट.!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : तालुक्यातील पारवा येथे पशु वैद्यकीय कार्यालयासमोर रिक्त असलेल्या जागा तसेच जुन्या गावठानच्या जागेवर गावातील मोठ्या व्यापाऱ्यांनी व लोकांनी केलेले अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. सदर गोवठानच्या जागेवर मंदीर असुन अतिक्रमणामुळे मंदिराचा रस्ता बंद झाला आहे. तसेच सदर जागेवर गावातील बैलपोळा भरत होता. परंतु अतिक्रमणामुळे सदरचा रस्ता जाण्यास शिल्लक नसून उपरोक्त वापरण्यासाठी जागा शिल्लक उरलेली नाही. तर काही मोठ्या व्यापारांनी लाखोंचा अवैध व्यवहार करून जागा ताब्यात घेतलेली आहे. याबाबत पारवा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणे यांनी तहसीलदार घाटंजी, गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी, ठाणेदार पारवा, सरपंच ग्रामपंचायत पारवा व सचिव ग्रामपंचायत पारवा यांना रितसर तक्रार दाखल करण्यात आली. परंतु या बाबत पारवा ग्रामपंचायतीने तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याने आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपोषण कर्ते संतोष दवने यांनी दिली. ग्रामपंचायत कार्यालयात या बाबत चौकशी केली असता सदर जागेची कोणत्याही प्रकारची टॅक्स पावती व नमुना आठ अ प्रत अतिक्रमण धारकांकडे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच तक्रारीदार संतोष दवने यांनी तक्रारीसोबत सरकारी जमीनीचा 7/12 उतारा सुद्धा जोडलेला आहे, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे पारवा येथील उपरोक्त गावठान या शासनाच्या जमिनीवरील संपूर्ण बेकायदेशीर अतिक्रमण हटण्याबाबत संतोष दवणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या मुळे पारवा विभागात खळबळ माजली आहे.