Home उत्तर महाराष्ट्र मुद्राय फाऊंडेशनचा”राज्यस्थरिय मैत्री पुरस्कार राम खुर्दळ यांना प्रदान.

मुद्राय फाऊंडेशनचा”राज्यस्थरिय मैत्री पुरस्कार राम खुर्दळ यांना प्रदान.

221

नाशिक – दुर्गसंवर्धन,पत्रकारिता,अध्यात्म,संस्कृती,परंपरा,पर्यावरण क्षेत्रात तसेच ग्रामविकासाचे सेवाकार्य करणारे राम खुर्दळ यांना

मुद्राय युवा फाउंडेशन या संस्थेचा “राज्यस्थरिय मैत्री पुरस्कार” ऑलम्पिक पदक विजेता दत्तूभाऊ भोकनळ यांचे हस्ते राम खुर्दळ यांना (दि.१० रोजी) प्रदान करण्यात आला.

मुद्राय फाउंडेशनचा मैत्री सन्मान पुरस्कार ऑलम्पिक पदक विजेता दत्तूभाऊ भोकनळ यांचे हस्ते स्वीकारताना सामाजिक क्षेत्रातील दुर्गसंवर्धन व सेवाकार्यातील राम खुर्दळ.
व्यासपीठवर विविध आंतरराष्ट्रीय खेळाडू व मान्यवर

यावेळी पहिली भारतीय महिला बॉडीबिल्डर भारत,आशिया श्री,स्नेहा सचिन कोकणे पाटील,नासा आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या स्पेस एज्युकेटर इंजी.अपूर्वा जाखडी,भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भावना गवळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मुद्राय युवा फाउंडेशन चा १५ वा वर्धापनदिन नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात स्व.कारभारी मटाले उद्यानात झाला या निमित्त विविध सेवा कर्मीना “मैत्री सन्मान पुरस्कार”देण्यात आले.यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात त्यागाने कार्यरत मंडळींचा सन्मान करण्यात आला.यावेळी राम खुर्दळ यांना दुर्गसंवर्धन,
पत्रकारिता,अध्यात्म,संस्कृती तसेच ग्रामविकासाचे सेवाकार्याबद्दल गौरवण्यात आले.त्यांचे विविध क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.यावेळी मुद्राय फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन देवरे यांनी प्रास्ताविक केले व आभार सौ देवरे यांनी मांडले.