आत्महत्या दर्शवण्याचा केला बनव
२४ तासाच्या आत पत्नी व प्रियकरला अटक
प्रतिनिधी:प्रा. मो.शोएबोद्दीन (आलेगाव)
पातूर : पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. यानंतर लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नीने आपल्या पतीची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. आता वैद्यकीय अहवालात ही बाब उघडकीस येताच मृतांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.
पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे (वय ४५, राहणार सावरगाव) हे काम करीत असून तिथेच रखवालदार म्हणून राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील राहायची. दरम्यान, मागील काही दिवस अगोदर बंडू हे बेपत्ता झाले. याबाबत त्यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे (वय ३५) यांनी पातूर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सावरगाव इथे शुक्रवारी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी बंडू या व्यक्तीचा कार्ला शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, वैद्यकीय अहवाला अहवालात त्या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी बंडू यांची हत्या केल्याचं उघड झालंय.
मृतक बंडू डाखोरे त्यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे (३५) हिचे गजानन शेरू बावणे या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमाचे कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच बंडूला लागली. त्यातून दोघे पती-पत्नीचे सतत वाद व्हायचे, अखेर पत्नीने पतीचा काटा काढण्याचा निश्चित केलं. दरम्यान, गजानन बावणे आणि मृतक बंडू यांची मैत्री असून चांगले संबंध होते. गजाननचे बंडूच्या घरी मी ये-जा राहायचे. त्यातून मीरा आणि गजानन प्रेम संबंध जुळले. दरम्यान, गजानन आणि बंडू हे दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले, त्यानंतर गजाननने दुपट्ट्याच्या साह्याने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी असं दर्शवून आत्महत्याचा बनाव रचला. त्यानंतर ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती, त्याच शेजारील शेतातील विहिरीत बंडू यांचा मृतदेह फरफटत नेऊन विहीरित फेकून दिला.
दरम्यान, हत्यानंतर मृतक बंडूच्या पत्नीने म्हणजेच मीराने पातुर पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधात तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शेजारीलच विहिरीत बेपत्ता असलेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हे सर्व आत्महत्या रचून हत्येचा केल्याचे प्रकरण उघडे झाले. सध्या मारेकरी पत्नी आणि तिचा प्रियकर गजानन बावणे हे पातूर पोलीसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.