Home मराठवाडा मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या प्रयत्नाला यश,परतावा मिळण्याच्या हालचालींना मिळाली‌ दिशा…

मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या प्रयत्नाला यश,परतावा मिळण्याच्या हालचालींना मिळाली‌ दिशा…

309

जालना -लक्ष्मण बिलोरे

२०१५-१६ च्या दरम्यान बंद पडलेल्या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी गेल्या ७ वर्षांपासून मरनासन्न यातना भोगत असलेल्या मैत्रेय पिडीत गुंतवणूकदारांना परताव्यासाठी संबंधी आशेचा किरण मिळू लागला आहे. मैत्रेयच्या कोर्ट प्रकरणात आज सहा वर्षानंतर मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेतर्फे वकीलांची टीम सक्रीय झाली असून आज बुधवारी ,ता.१४ डिसेंबर २०२२ रोजी ॲड.सुरज पाटील,ॲड. जमखंडी, ॲड.संतोष भटगुणाकी,ॲड.राहूल अधिकारी मुंबई। शेषण कोर्टात हजर होते.दरम्यान,३२२ मालमत्ता विक्रीस तयार आहे, मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेच्या विक्रीस परवानगी मिळावी, अशी मागणी मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेच्या वकीलांनी केली.सदरची मालमत्ता विक्रीस परवानगी मिळावी,संघटनेच्या बाजूने खटला लढत असलेल्या वकिलांची हि मागणी शेशन्स कोर्टाचे न्यायाधीश सन्मा.तपकिरे यांनी मान्य केली.मैत्रेयच्या या जप्त केलेल्या दोन मालमत्तांवर मैत्रेय ग्रुप कंपनीचे संचालक तथा आरोपी विजय तावरे व लक्ष्मीकांत नार्वेकर यांनी आक्षेप घेतला आहे. मैत्रेय गुंतवणूकदारांना त्यांना त्यांचा हक्काचा,कष्टाचा परतावा मिळालाच पाहिजे.या एकमेव‌ उद्देशाने अधिकृतपणे स्थापन झालेल्या मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेच्या वकिलांचे कोर्टातील पहीले यश आहे.संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता कदम,उपाध्यक्ष उदय संखे,सुमन कदम,माधुरी बागुल, हरपनहळ्ळी,अनिता हल्लाळे,हेमलता पाटील,सरिता व्यवहारे,प्रमिला सोनवणे,शुभांगी पगारे,उज्वला सोनार यांनी शेशन्स कोर्टात लावली.संघटनेचे सुचित दुसाने,रामराव मोरे,विष्णू संकपाळ,मयूर शिरोडे,कल्पना महाजन,कैलास मालपाणी हे सभासद सातत्याने पाठपुरावा करत आहेत.