Home जळगाव दुप्पट पैशांचे लालच तरुणाला 31 लाखात फसवले

दुप्पट पैशांचे लालच तरुणाला 31 लाखात फसवले

172

जळगाव:{आनंद पाटील} पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली जळगाव शहरातील सदोबा नगरात राहणाऱ्या एका तरुणाला तब्बल 31 लाख 50 हजारात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . याप्रकरणी गुरुवार 15 डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये औरंगाबाद येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश तुकाराम भोळे (वय 35, रा. आसोदा ता. जि. जळगाव ह. मु. सदोबा नगर जळगाव) हा तरुण खाजगी नोकरी करून आपला परिवारासह राहतो. फेब्रुवारी 2022 मध्ये महेश भोळे यांची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे याच्याशी झाली. अरुण यांनी औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे डोप नावाचे शिंपल्यापासून मोती तयार करण्याची शेती नावाची कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांची पत्नी, मुलगी, इतर तीन जण संचालक म्हणून काम पाहत आहे.
अरुण अंभोरे याने महेश भोळे यांच्याशी संपर्क करून 23 महिन्यात पैसे दुप्पट होतील असे सांगून महेश यांच्याकडून वेळोवेळी 31 लाख 50 हजार रुपये घेत त्याच्या बदल्यात अरुण याने दोन कोरे चेक देऊन फसवणूक केली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महेश भोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी 15 डिसेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपी अरुण नागोराव अंभोरे त्यांची पत्नी मंदा अरुण अंभोरे, मुलगी, राहुल शेळके, विनोद बाहेकर आणि इतर आठ जण रा. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.