रवि माळवी
यवतमाळ , दि. ०१ :- आरोपीच्या पत्नीसोबत मृतकाचे अनैतीक संबंध असल्याच्या संशयावरुन व तिला माहेरी वरुड येथे नेवून सोडल्याच्या कारणावरुन आरोपीने मृतकाचा चाकुने भोसकुन खुन केला होता. ही घटना दिनांक ४.२.२०१९ ला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बाभुळगांव तालुक्यातील खर्डा येथे घडली होती.
अजय रामदास जयसिंगपुरे (४७) रा.खर्डा असे मृतकाचे नाव आहे तर उमेश शामराव देवकर (२९) रा.खर्डा असे आरोपीचे नाव आहे. बाभूळगांव पोलीस स्टेशन हद्दीतील खर्डा येथे दिनांक ४.२.२०१९ चे सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजताच्या दरम्यान मृतक अजय जियसिंगपुरे यास आरोपी उमेरश देवकर याचे पत्नीस मृतक याने माहेरी वरुड येथे नेवून का सोडले व पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय याचा राग मनात धरुन खर्डा गावातील बाजार ओट्याजवळ मृतक अजय यास आरोपीने चाकुने भोसकुन जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. मृतक याने रुग्णालयात दिलेल्या मृत्यूपुर्व जबानी वरुन सर तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद त्र्यंबकराव देशमुख बाभुळगाव पोलीस स्टेशन यांनी प्रथम अप. क्र.८२/२०१९ भादंवि क.३०७ चे समाविष्ट करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे, बाभुळगांव पोलीस स्टेशन यांनी करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पवार बाभुळगांव पोलीस स्टेशन यांनी करुन तपासाअंती आरोपी विरुध्द वि.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटला वि.श्री.किशोर पेटकर, प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश यवतमाळ येथे से.के.क्रमांक १०७/२०१९ प्रमाणे सुनावणी करीता सुरु असतांना वि.श्री.किशोर पेटकर साहेब, प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश यवतमाळ यांनी दिनांक ३१.१.२०२० रोजी सदर खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये आरोपी उमेश देवकर यास भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणात सरकार तर्फे ए.जी.पी.श्री.मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले तर, पो.हे.कॉ. /१५४५ प्रकाश रत्ने बाभुळगांव पोलीस स्टेशन यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहीले.

Post Views: 406