➡️ घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुषमा बावीस्कर व पोलीस पथकाची कार्यवाही..!
( अयनुद्दीन सोलंकी )
———————–
घाटंजी : घाटंजी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्याने घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुषमा बावीस्कर हया आपल्या पोलीस पथकासह पेट्रोलींग वर जात असतांना घाटंजी लगत असलेल्या पंजाबी जिनिंगच्या बाजुला असलेल्या अखील सुधीर सुचक (वय 40) यांच्या मालकीच्या शेतात रात्री लाईटचा प्रकाश दिसला. म्हणून पोलीस पथक हे प्रकाश दिसत असलेल्या शेतात चौकशी केली असता, तेथे एक्का बादशहा पत्याचा जुगार खेळ सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी धाड टाकुन रोख व मालमत्ता मिळुन 1 लाख 16 हजार 565 रुपयाची मालमत्ता जप्त करुन आठ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तत्पुर्वी सदर शेतात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली होती, हे विशेष.
जुगार प्रकरणात ठाणेदार सुषमा चंद्रभान बावीस्कर ह्या फिर्यादी असुन आरोपीचे नांव असे आहे. आरोपी सागर भेंडारकर (वय 30, मारोती वार्ड घाटंजी), पियुष उन्नरकर (वय 25, अंबादेवी वार्ड घाटंजी), खुशाल शिरसकर (वय 55, ईस्तारी नगर घाटंजी), हनुमंत नामपेल्लीवार (वय 43, मानोली), गजानन ठाकरे (वय 41, दुर्गामाता वार्ड घाटंजी), अमोल बावनकसे (वय 34, राम मंदीर वार्ड घाटंजी), सुनिल नेवारे (वय 40, दुर्गामाता वार्ड घाटंजी) व अखील सुचक (वय 40, मारोती वार्ड घाटंजी) या आठ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे अखिल सुचक यांनी आपल्या शेतात जुगार भरवुन प्रत्येका कडुन 200 रुपये प्रमाणे कट्टा काढुन पैसे जमा केले होते.
सदर धाड मध्ये घाटंजी पोलीसांनी आरोपींता कडुन 15 हजार 365 रुपये रोख, एक्का बादशहा या डावावर लावण्यात आलेले 3 हजार 200 रुपये असा एकूण 18 हजार 565 रुपये रोख तसेच ईतर मालमत्ता मिळुन 1 लाख 16 हजार 565 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली.
सदरची धाड घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर, गोपनीय विभागाचे पोलीस काॅन्स्टेबल वामन जाधव, ठाणेदाराचे रायटर दिनेश जाधव, पोलीस काॅन्स्टेबल विनोद मेश्राम आदींनी सदर धाड यशस्वी केली. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर हे पुढील तपास करीत आहे.