कळंबनेर गावात विधार्थीनी केले श्रमदान
राळेगाव :- न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे संप्पन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा उदघाटन सोहळा 14 डिसेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी शेख लुकमान उपस्थित होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कळमनेर उपसरपंच नारायण इंगोले, गंगाधर गोटे, त्रिवेणी नागमोते, पी. एम. कामडी, दिनेश भेले असे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून कळंबनेर गावात एका कालव्यावर बंधारा बांधण्यात आला, गावात शोषखड्डे निर्माण करण्यात आले, दररोज ग्राम सफाई करण्यात आली आहे. त्याचं प्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात एड. रोशनीताई वानोळे, निखिल राऊत, जिल्हा समन्व्यक प्रा. गजानन जाधव आणि रणजित दांडगे यांनी विद्यार्थी व गावाकऱ्याना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे 20 डिसेंबर रोजी या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा रंगारंग विद्यार्थी नृत्य आयोजित करून समारोप सुद्धा करण्यात आला.या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बी.के. धर्मे साहेब हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्था सचिव डॉ.अर्चनाताई धर्मे, उपप्राचार्य विजय कचरे, विनोद चिरडे, नितीन जुनूनकर, प्रतीक ताकसांडे, गणेश झाडें, राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण चौधरी, प्रा. रवि चिकाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य कळमनेर गंगाधर गोटे, कांबळे साहेब, भगत मॅडम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एम.कामडी हे यावेळी उपस्थित होते. दिनांक 14 डिसेंबर पासून तर 20 डिसेंबर पर्यंत एन. एस. एस. च्या मुलांनी आपल्या श्रमदानातून आणि अनेक चांगल्या वक्त्यांच्या व्याख्यानातून आपला व ग्रामस्थाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न यावेळी केल्यामुळे कळंबनेर ग्रामस्था मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे…