दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————
घाटंजी : घाटंजी येथील तत्कालीन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी वरळी मटका लावण्याच्या प्रकरणात घाटंजी येथील दोन आरोपींना प्रत्येकी दोनशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक दिवसाची साधी शिक्षा अशी शिक्षा ७ मे रोजीच्या लोक अदालतीत सुनावण्यात आली होती. तसे न्यायालयाच्या रेकॉर्डवर नोंद आहे.
मात्र, दंड व शीक्षा ठोठावण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी आम्ही ७ मे रोजीच्या लोक अदालतीत उपस्थित नव्हतो, असा दावा करुन सदर गैरप्रकाराचा निकाल लागावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे व एम. डब्लु. चंदवानी यांच्या खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
घाटंजी येथील अजय अक्कलवार व विलास बगमारे अशी आरोपींची नांवे असुन त्यांच्या याचिकेवरुन राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव व ईतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असुन चार आठवडयात उत्तर दाखल करण्याचे निर्देश प्रतिवादींना दिले आहे. शासनाची नोटीस सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. आय. जे. दामले यांनी स्विकारली आहे.
विशेष बाब म्हणजे पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त शिक्षेच्या आधारावर आरोपी अजय अक्कलवार यांस २३ नोव्हेंबर रोजी चार जिल्ह्यांतुन हद्दपार करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे संबंधित आरोपी न्यायालयात उपस्थित नसतांना हद्दपारीची नोटीस प्राप्त झाल्याने तसेच न्यायालयातील कागदपत्रे काढल्यानंतर आरोपींच्या लक्षात आल्याने आपन ७ मे रोजीच्या लोक अदालतीत घाटंजी न्यायालयात उपस्थित नसल्याचे सांगुन आरोपींनी न्यायालयातील कागदपत्रे काढुन त्यावरील हस्ताक्षर हस्ताक्षर तज्ञांकडून तपासणी करुन अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग व न्यायालयाची फसवणूक झाल्याचे संबंधित आरोपींचे म्हणने असुन सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी याचिका करत्यांनी उच्च न्यायालयात केली आहे.आरोपी अजय अक्कलवार व ईतरांतर्फे ॲड. मोहीत खजांची व ॲड. महेश धात्रक यांनी काम पाहिले.