निखिल वाहणे – चांदुर रेल्वे
अमरावती – चांदुर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे येथे नवनिर्वाचित सरपंच प्रशांत कोल्हे यांनी पुर्वकल्पना न देता कस्तुरबा सोलर चरखा च्या मशीना सभामंडपाच्या बाहेर काढल्या .
राज्य शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळा अंतर्गत जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ अमरावती यांचे माध्यमातून ग्राम दिघी कोल्हे येथे सात वर्षांपासून सुरू असलेल्या कस्तुरबा सोलर चरखा समुहाच्या अनुसूचित जाती च्या दहा महीलांना बॅक ऑफ इंडिया शाखा मालखेड रेल्वे येथुन जिल्हा खादी ग्रामोद्योग यांनी कर्ज मंजूर करून दिले, दहा महीलांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.
सदर प्रकल्पा अंतर्गत दहा महीलांना रोजगार उपलब्ध झाला व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या प्रकल्पाच्या माध्यमातून होत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोणा काळात त्यांचा चरखा समुहाला कच्च्या माल उपलब्ध होत नसल्याने चरखा समुहाचे काम बंद पाडले होते. यातच नव्याने निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच प्रशांत कोल्हे यांनी या कस्तुरबा सोलर चरखा समुहाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता सभामंडपात असलेल्या सोलर चरखा मशीन बाहेर काढल्या. त्या काढते वेळी ग्रामपंचायत सचिव व कोणत्या समुहाच्या महीला उपस्थित नव्हत्या.