किट्टी आडगाव(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवस दि.१४ जानेवारी रोजी होता. त्यानिमित्त इतर खर्च न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे गनप्रमुख पाराजी आगे, ग्रा.प.सदस्य नारायण आगे यांच्या संकल्पनेतून गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
वाढदिवस म्हटल कि बँनर बाजी, केक, पार्टी अशाप्रकारचा अन आवश्यक खर्च मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु आपल्या नेताच्या वाढदिवसी अनावश्यक खर्च न होता समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस विद्यमान आमदार प्रकाश सोळंक यांच्या निकटवर्तीयांनी केला. त्यानिमित्यांने वाढदिवसाला होणारा खर्च न करता पाराजी आगे व नारायण आगे यांनी शालेय साहित्य गोळा करून माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर किट्टी आडगाव या शाळेत गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे. गरजु विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
कार्यक्रमाचे आयोजक गन प्रमुख पाराजी आप्पा आगे तर प्रमुख उपस्थीती म्हणून सरपंच रुक्मानंद खेत्रे व चेअरमन आशोक आगे,ग्रा.प.सदस्य विष्णुपंत आगे,सहकार्य दिलीप आगे,ग्रा.पं.सदस्य नारायण आगे,मोहन आगे,माऊली गांजपुरे,पाडुरंग आगे, पत्रकार रामराव आगे,पदमाकर देशमुख,आप्पा घाटुळ,सोमेश्वर आगे,आशोक सर रासवे, संचालक कुमार रासवे, ग्रापंचायत सदस्य अरविंद काका देशमुख सह सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.