घाटंजी – औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दी. १२ ला स्वामी विवेकानंद तथा माँ जिजाऊ जयंती व त्या निमित्त रक्तदान कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट निदेशक आर. एम. मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून गट निदेशक जे.पी. डाफ, रत्नदर्शी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भूषन मेटकर आदी उपस्थित होते.
बेसिक कॉस्मेटिक ची विद्यार्थिनी कु. अश्विनी क्षिरसागर हिने माँ जिजाउची वेशभूषा परिधान करून मनोगत व्यक्त केले. विजतंत्री विभागाची विध्यार्थीनी कु. ऋतुजा आरेकर, कु. स्वेता काठोटे, कु. सोनाली फुंदे, अजय मस्के तथा बेकरी विभागाचा आयुष मेश्राम यांनी यावेळी भाषणे दिली.
रक्तदान शिबिरामध्ये संस्थेतील कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थी यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. प्रसंगी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमुचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पांडे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी संजय पोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.