Home पुणे पुणे जिल्हातील नहारसिंगपुर , इंदापूरात “पत्रकार संरक्षण समिती” तर्फे सन्मान सोहळा संपन्न…!

पुणे जिल्हातील नहारसिंगपुर , इंदापूरात “पत्रकार संरक्षण समिती” तर्फे सन्मान सोहळा संपन्न…!

176

मला तालुक्यातील गोरगरिब जनतेबरोबर पत्रकार सुध्दा महत्वाचे – आमदार दत्तात्रय भरणे

पत्रकारांच्या लेखनीतून गरीब व विकासापासून वंचितांना न्याय मिळावा..

पुणे – पत्रकार दिनानिमित्त नीरा नरसिंगपुर, इंदापुरात पत्रकार संरक्षण समिती तर्फे 101 समाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे, पुण्याचे ॲड. संतोष शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष – नाथाभाऊ उंद्रे यांच्या हस्ते संपन्न आज झाला.

पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने निरा नरसिंगपुर येथे कोरोना योध्दा, पत्रकार, डॉक्टर्स, नर्स, शिक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी आदी 101 जणांचा पुरस्कार देवून आमदार श्री. दत्तात्रय भरणे, समितीचे कायदा सल्लागार ॲड. संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री. नाथाभाऊ उन्द्रे यांच्या हस्ते आज दि. 22 जानेवारी रोजी सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांनी विषयाचे भान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे, जो जनसेवक खऱ्या अर्थाने कार्य करतो त्याच्या कामाबाबत दाखल घेवुन सत्याची कास धरली पाहिजे,सत्य समोर आणण्याचे काम केले पाहिजे, तळागाळातील लोकांची कामे झाली पाहिजे आदी विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांनी देखील पत्रकाराने कोणत्याही विषयाला न घाबरता तसेच अमिषाला बळी न पडता आपले पत्रकारितेचे भान राखून बातम्या तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचविल्या पाहिजे, युवा पिढीला प्रोत्साहन देवून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सरकारने योजना राबविल्या पाहिजे. कोणतीही अडचण असो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,असे मत शिंदे यांनी यावेळी मांडले.
समितीचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे यांनी देखील संस्थापक श्री. विनोद पत्रे हे अन्य कार्यात व्यस्त असल्याने येवू न शकल्याने आपले विचार व्यक्त करून समितीच्या कार्याबाबत प्रस्तावना केली व पत्रकार समितीच्या माहितीचा आढावा दिला. यावेळी डॉ. मोहन वाघ, प्रोफेसर सुरेश वाळेकर यांनी देखील आपले विचार मांडले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका अध्यक्ष – बाळासाहेब सुतार, डॉ. सरवदे व इंदापूर तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.