Home वाशिम मंगरूळपीर शहरात एकाच रात्री दोन मंदिरात चोरी

मंगरूळपीर शहरात एकाच रात्री दोन मंदिरात चोरी

62

 

मंदीरातुन लाखोंचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

वाशिम:-जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात मागील काही दिवसांत चोरीच्या घटनेत वाढ झाली असून,मध्यरात्री मंगलधाम परिसरातील दोन मंदिरात चोरट्यानी हात साफ केला आहे.दरम्यान शहरातील गजानन महाराज मंदिर आणि साईबाबा मंदिर याठिकाणी रात्रीच्या वेळी चोरट्यानी दान पेटीतील रोख रक्कम आणि मूर्तीवरील दागिने असा लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

वाशिम जिल्ह्यात सध्या चोरांनी धुमाकुळ घातला असुन पोलीसांच्या नाकावर टिच्चुन कुठे दिवसाढवळ्या तर कुठे अंधाराचा फायदा घेत राञीच्या वेळी असे घरफोडीचे सञ सुरुच आहे.मंगरुळपीर शहहरातील मंगलधाम परिसरातील गजानन महाराज मंदिर आणी साई मंदिरात एकाच राञी चोरांनी मुर्तिच्या अंगावरील सोन्याचे दागीणे आणी दानपेटीतील रक्कम कुलूप तोडुन चोरल्यामुळे परिसरात एकच खळबळ ऊडाली.आता मंदिरेही सुरक्षित नसल्याची चर्चा परिसरात पसरली होती.या चोरीची माहिती मंगरूळपीर पोलिसांना मिळताच मंगरुळपीरचे ठाणेदार सुनिल हूड यांनी घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा करत तपास सुरु केला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मात्र मागील महिनाभरात मंगरूळपीर शहरात चोरीच्या घटना वाढल्यानं पोलिसांपुढे या चोरट्यांना शोधन्याचे मोठे आव्हान पुढे ऊभे राहले आहे.मागील महिन्यात त्याच मंगलधाम काॅलनितली एकाच राञी पाच घरे फोडुन चाळीस लाखावर मुद्देमाल चोरांनी लंपास केला होता त्याचा तपास थंडबस्त्यात असतांना पुन्हा चोरांनी त्याच परिसरातील मंदिरात चोरी केल्याने पोलिसांपुढे चोरांना शोधन्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरीकांनी सिसिटिव्ही कॅमेरे बसवुन तसेच घराची सुरक्षा राहिल याचे नियोजन करावे असे सांगुन लवकरच या चोरांना पकडुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस विभागाने सांगीतले.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206