मनिष गुडधे……………………
अमरावती – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले. मात्र या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले डॉ. रणजीत पाटील हे अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच प्रचाराची मुदत संपलेली असतानाही आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने डॉ. रणजित पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि. २९) महेश भवन येथे मेळावा आयोजित केला होता. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाने (फिरते पथक) राजा पेठ पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीवरून भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता भाषण सुरू होते. ही बाब पथकाच्या लक्षात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच रणजीत पाटील हे अडचणीत आले आहेत.