Home महाराष्ट्र शिवशाही फाउंडेशन, भारत तर्फ ‘ हर घर संविधान ‘

शिवशाही फाउंडेशन, भारत तर्फ ‘ हर घर संविधान ‘

144

या मोहीम अंतर्गत आज माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना संविधानाची प्रत देण्यात आली. ही मोहीम राज्यभर राबवण्यात येत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ” देशाचे संविधान हे सर्वोच्च आहे.

संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले.संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचवले पाहीजे. संस्थेचे संस्थापक बाळाराम माडकर यांनी संस्थेची माहिती दिली.हर घर संविधान मोहीमबद्दल माहिती देताना माडकर म्हणाले, “26 नोव्हेंबर 2022 पासून ही मोहीम सुरूवात करण्यात आली.या मोहीमेतून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासनिक सर्व विचारवंत व विद्यार्थांना संविधानाने महत्व, अधिकाराचे प्रचार व प्रसार पूर्ण भारतभर करणे हे उद्दिष्ट आहे.हर घर संविधान मोहीमचे प्रमुख प्रदेश संयोजक प्रा.डॉ.अमितराज माने यांनी मोहीम बद्दल गेली दीड महिन्यात 201 संविधान प्रत राज्यभर देण्यात आली. याची माहीती चव्हाण साहेबांना दिली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्री.ॠषीकेश पाटील यांनी भविष्यात संस्थेची विविध मोहीमची माहीती दिली.हर घर संविधान ‘ मोहीम अंतर्गत आज माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना संविधानाची प्रत देताना संस्थेचे संस्थापक -राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर ,प्रदेश संयोजक प्रा.अमितराज माने,प्रदेश उपाध्यक्ष श्री.ॠषीकेश पाटील, प्रदेश सचिव ऋतुराज पाटील, जिल्हाध्यक्ष रोहित सुर्यवंशी,मोहम्मद कोकणे,विश्वजीत पाटील, योगेश देसाई, शुभम माळी,तुकाराम माडकर, तेजस पारगावकर हे सर्व उपस्थितीत होते.