Home नाशिक दोन लेकरांच्या आईचा मन त्या मुलावर आला अन , विपरितच घडलं...

दोन लेकरांच्या आईचा मन त्या मुलावर आला अन , विपरितच घडलं ?

164

ती महिला पोलिसांच्या ताब्यात ,

अमीन शाह
मन एक अशी गोष्ट आहे की तो केव्हा कोणावर येईल हे सांगता येणे कठीण आहे काही ऐ ग्रेट च्या चित्रपटा च्या कथे प्रमाणेच आपल्या
महाराष्ट्रात राज्यात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार नाशिक इथे समोर आलेला असून एका दोन मुलांच्या आईने एका अल्पवयीन मुलाला गोड गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याला दारूचे व्यसन लावले. एके-दिवशी तिने त्याला पॉर्न व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर आपल्या सोबत असा प्रकार करण्याचे तिने त्याला सांगितले आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. अखेर प्रकरण बाहेर आल्यानंतर या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगा हा कल्याण येथील रहिवासी असून आरोपी महिला नाशिकची आहे. दोन मुलांची आई असलेली ही महिला हिचा पतीपासून घटस्फोट झालेला असून या महिले सोबत पीडित मुलाची आत्या राहते. पीडित मुलगा हा आत्याकडे नाशिकला येत असल्याकारणाने त्याची आणि या महिलेची ओळख झालेली होती. आत्या जेव्हा कधी कल्याण येथे या मुलाकडे येत असायची त्यावेळी ही महिला देखील तिच्यासोबत येत असल्याने ती देखील मुलाच्या कुटुंबाची फॅमिली फ्रेंड झालेली होती.

पीडित मुलगा देखील काही काळाने नाशिकला जाऊ लागला त्यानंतर आत्या कधी घरी नसेल तर तो आत्याची वाट बघत या महिलेच्या सोबत घरात थांबायचा त्यामुळे महिलेची आणि त्याची जवळीक वाढली. एके दिवशी महिलेने त्याला गोड गोड बोलत दारू पाजली आणि बेडरूममध्ये नेत तिने मोबाईलमध्ये काही पॉर्न व्हिडिओ त्याला दाखवले आणि आपल्यासोबत असा प्रकार करण्याची त्याला ऑफर दिली. तिने त्याला शारीरिक संबंध कसे ठेवायचे हे शिकवत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे काही काळानंतर तो आपल्यापासून दुरावू शकतो म्हणून या महिलेने चक्क त्याचा व्हिडिओ देखील शूट केला आणि मोबाईलमध्ये तो रेकॉर्ड केला.

दुसरीकडे आपला लहान मुलगा सातत्याने मोबाईल मध्ये खेळत असतो हे मुलाच्या आईच्या लक्षात आले आणि त्यानंतर आईने एके दिवशी त्याचा मोबाईल हाती घेतला त्यावेळी तिच्या त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये या महिलेसोबत त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ आईला दिसला आणि तिच्या पाया खालची जमिनीच सरकली. कसेबसे स्वतःला सावरत या मुलाच्या आईने पोलीस स्टेशन गाठले आणि महिलेच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकलेल्या असून अल्पवयीन मुलाला भिवंडी शहरातील बालसुधारग्रहात दाखल करण्यात आलेले आहे.