जळगाव :(शाह एजाज़ गुलाब)
येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ शाहीन काझी ज्युनिअर कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारीतोषीक वितरण कार्यक्रम संस्था अध्यक्ष अल्हाज डॉ. अमानुल्लाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष अल्हाज अब्दुल मजीद सेठ ज़करीया, शेख जफर सर , मुफ्ती हारून नदवी ,ज़ाहीद शाह उपस्थित होते यावेळी डॉ अमानुल्लाह शाह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक व शिक्षण हे विद्यार्थीनींच्या जिवनात कसे म्हतवाचे आहे हे सांगितले तर मुफ्ती हारून नदवी यांनी सर्व धर्मात मुलींना शिक्षणाचा अधिकार कसा दिला आहे हे सांगितले अमीनभाई बादली वाला,ज़फर शेख सर, रशीद शेख सर यांनी देखील विचार व्यक्त केले यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी उर्दू ,मराठी, व इंग्रजी भाषांमध्ये लोकगीत, नाट्यगीत व नाटीय सादर केल्या तसेच मॅथस क्लब व शालेय स्तरावर खेळातील विजयी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र , ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मझरोद्दीन शेख तबरेज शेख व मोहसीन शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन रिज़वाना सय्यद यांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख यांनी नियोजन व मार्गदर्शन केले.