Home बीड ई-सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र,सेतू केंद्र ,आधार केंद्रात दरफलक लावा ; निवासी उपजिल्हाधिकारी...

ई-सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र,सेतू केंद्र ,आधार केंद्रात दरफलक लावा ; निवासी उपजिल्हाधिकारी यांचे तहसिलदारांना आदेश माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली होती तक्रार

195

बीड -; बीड जिल्ह्यातील ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र ,सेतू केंद्र, आधार केंद्र मध्ये शुल्क दर फलक लावण्यात यावेत असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना आदेश दिले आहेत याबाबत माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती

सामान्य जनतेला आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्र साठी इतरत्र कुठे भटकू नये व त्यांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने ई सेवा केंद्र,आपले सरकार केंद्र सेतू केंद्र,आधार केंद्र, इत्यादी ची सुविधा करून दिली आहे ज्यामध्ये आधार कार्ड ,जातप्रमाणपत्र , नेशनिलीटी , डोमिसैल , एफिडीबेत रेशनकार्ड,राजपत्र अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत सोबत च नागरिकांची लूट होऊ नये म्हणून शासनाने यासाठी लागणारे शुल्क सुद्धा निश्चित करून दिलेली आहेत. परंतु केंद्र संचालक द्वारा केंद्रा वर सेवनुसर शुल्काचे फलक न लावल्याने नागरिक मध्ये शुल्क विषय संभ्रम निर्माण होतो व जास्तीचा आगाऊ शुल्क घेऊन त्यांची आर्थिक फसणूक केली जात आहे. शासनाने सर्वच केंद्रा साठी एक समान दर निश्चित केला असून ही शुल्क दर फलक न लावल्यामुळे नागरिकांना शुल्काची माहिती मिळत नाही.यामुळे ते फसणुकी चे बळी पडतात अशी तक्रार माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती सदर तक्रारीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांनी सर्व तहसिलदार जिल्हा बीड यांना आदेश देवून आपल्या तालूक्यात कार्यरत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये दिल्या जाणार्या सेवाची ,प्रमाणपत्राची माहीती व दर पत्रक ठळक अक्षरात व दर्शनी भागात लावण्याबाबत कळविण्यात यावे व तसेच ई-सेवा केंद्र ,आपले सरकार केंद्र,सेतू केंद्र,आधार केंद्र मध्ये दिल्या जाणार्या विहीत सेवासाठी शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे शुल्क आकारनी करणेबाबत कळविण्यात यावे असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांनी सर्व तहसिलदार बीड जिल्हा यांना दिले आहेत तसेच निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांनी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय बीड जिल्हा समन्वयक महा-आयटी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना सदर तक्रारीवर कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे