Home पालघर महाशिवरात्र निमित्ताने कौलाळे पांडवकाली शिव मंदिर येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह...

महाशिवरात्र निमित्ताने कौलाळे पांडवकाली शिव मंदिर येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

125
जव्हार :(सोमनाथ टोकरे ) जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत कौलाळे पांडवकालीन कौलाळे श्वर शिव मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कौलाळे पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी आयोजन केले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून जगात ओळख आहे. जवळपास बाराव्या शतकापासून महाराष्ट्राला सांप्रदायिक वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्तीनाथ,संत मुक्ताबाई ,संत जनाबाई,संत नामदेव, संत एकनाथ,संत तुकाराम, विठ्ठल रखुमाई हे यांच्या रूपात. असे अनेक थोर संत या भूमीवरती होऊन गेले. हे सर्व संत विविध जाती धर्माचे होते एकत्र येऊन त्यांनी वारकरी संप्रदाय करण्याचा प्रयत्न केला. हे फार लौकिक गोष्ट आहे. या सर्वांनी अभंग काव्याच्या माध्यमातून भरकटलेल्या समाजाला योग्य प्रवाहात आणण्याचे काम केले. जे आधी अखंडपणे त्यांनी लिहिलेल्या अभंग काव्यरचनेतून सुरूच आहे. यास्तव आधी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वारकरी संप्रदाय,आषाढी एकादशी,हनुमान जयंती, शिवजयंती दिंडी कीर्तन, भारुड भजन आदिचे आयोजन केले जाते. वरील प्रमाणे कोरळेश्वर येथे महाशिवरात्रीचे अवचित साधून दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी ह. भ.प परमपूज्य. गुरुवर्य विठोबा महाराज भागडे ( इगतपुरी सदो -) यांच्या प्रेरणा घेतली आहे. या सप्त्याचे यंदा 18 वे वर्ष आहे. आज सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ती रात्री अकरा वाजेपर्यंत. सर्वात प्रथम सकाळी सहा वाजता पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत रंधा यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा झाली त्यानंतर श्री ची पूजा होईल अशा प्रकारे पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे. हरिपाठ. किर्तन प्रवचन. भजन आदीचे आयोजन केले आहे. यात टोकर खांड, पळसपाडा, पवार पाडा भोकर हट्टी, मोख्या चा पाडा, झाप, नांदगाव, कुरलोद,पोंडीचा पाडा, चिंचवाडी गोरठाण, देवगाव, नांगरमोडा, केळघर , विक्रमगड, येथील प्रवचनकार आपले प्रवचन देतील आणि मोठ्या संख्येने भजनी मंडळ मोठ्या संख्येने भाविक भक्त यात सहभागी होतात. जव्हार शहरापासून पासून 10 किमी अंतरावर असलेले कोला ळेश्वर वर येथील शिव मंदिरात शिव शंकराचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे पाषाणी शिवलिंग अस्तित्वात आहे. म्हणून हे ठिकाण पांडवांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले आहे. खरंतर याच कारणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे महाशिवरात्रीचे औपचारिक साधून दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंडळाचे हभप परमपूज्य विठोबा महाराज भागडे ( इगतपुरी ) किसन बाळू चौधरी, जानू बाबा चौधरी, धवळू महाराज मूर थडे, काशिनाथ बाबा निकुळे, रामा लखमा रंधाबाबा , परशुराम निकम बाबा, केशवजी घाणे साहेब,यांच्यापासून प्रेरणा घेतले आहे. या सप्त्याचे यंदा अ 18 वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताह 18 वर्षापासून सुरळीतपणे सुरू आहे. तसेच लवकरच येथील शिवमंदिर तीर्थक्षेत्र मान्यता मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असे यावेळी मी स्वतः ता उपसभापती या नात्याने चंद्रकांत रंधा यांनी बोलताना सांगितले.