Home पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा “पत्रकार संरक्षण समिती”ची कार्यकारिणी जाहीर

पुणे जिल्हा “पत्रकार संरक्षण समिती”ची कार्यकारिणी जाहीर

174
 हवेली प्रतिनिधी – ता.12 – मांजरी खुर्द येथे पत्रकार संरक्षण समिती पुणे जिल्हा(ग्रामीण/शहर) तालुका अध्यक्ष, जिल्हा प्रतीनिधी निवड जानेवारी २०२३ ते डिंसेबर २०२४ या कालावधीसाठी पदाधिकारी निवड नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला. उत्साही वातावरणात सर्वांना विश्वासात घेऊन नियुक्ती करण्यात आल्या. याप्रसंगी दैनिक पेपर प्रतिनिधी/वार्ताहर, साप्ताहिक प्रतिनिधी, सँटेलाईट चँनेल प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र खुडे यांच्या हस्ते नविन नियुक्ती पत्र देण्यात आली. पुणे जिल्हा सचिव पदी योगेश नाथाभाऊ ऊंद्रे,पुणे जिल्हा सल्लागार पदी अँड संतोष शिंदे, जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ.पल्लवी चांदगुडे, पुणे शहर अध्यक्ष पदी रोहित दळवी, जिल्हा उपाध्यक्ष पदी शिलवंत कांबळे, बाळासाहेब सुतार, प्रशांत तुपे,हवेली तालुका अध्यक्ष पदी प्रा.सुरेश वाळेकर, हवेली उपाध्यक्ष पदी डॉ. मोहन वाघ,इंदापूर तालुका अध्यक्ष पदी डाँ.सरवदे, बारामती तालुका अध्यक्ष पदी अमोल यादव सह तालुका उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष सह नवीन नियुक्ती करण्यात आल्या.सर्वांना निवडीनंतर पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे यांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मोहन वाघ यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे यांनी केले तर आभार हवेलीचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी मानले.