Home मुंबई Mumbai – मालाडमधील जामऋषी नगरातील झोपड्यांना आग; एका तरुणाचा मृत्यू, १५ सिलेंडरचा...

Mumbai – मालाडमधील जामऋषी नगरातील झोपड्यांना आग; एका तरुणाचा मृत्यू, १५ सिलेंडरचा स्फोट…!

175

आग लागलेल्या झोपडपट्टी वाशी यांचे पुनर्वसन शिंदे फडवणीस सरकार करेल का?

आग लागून बऱ्याच झोपडपट्टी वाशियाच्या संसाराची राख रांगोळी

मुंबई/सिद्धार्थ ज्ञानदेव काळे:-

मुंबई पश्चिम उपनगरांतील मालाड पुर्वकडील जामऋषी नगर (आंबेडकर नगर) या वन जमिनीवरील असलेल्या झोपडपट्टीला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत १४ वर्षीय तरुणाचा जागीत मृत्यू झाला असून १५ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. आगीत १० ते १५ झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर ४०० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.
आग लागलेल्या झोपडीतील सिलेंडर फुडल्याने आगीचे रूद्ररूप धारण केले. फुटलेल्या सिलेंडरमुळे मयत १४ वर्षीय तरुणाच्या गळामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलीसांकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
येथील वन जमिनीवर प्लस्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान एक सिलेंडर फुटला. फुटलेल्या सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी घरांबाहेर पळ काढला. यामुळे एका- मागून एक अशी १५ सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशामन दलाच्या गाड्या येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली त्यामुळे आगी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली. झोपडपट्टी परिसर असल्याकारणाने या ठिकाणी गाड्या येण्यासाठी मोठा त्रास होत होता.

या झोपडपट्टी मधील लोकांचे संसाराचे मोठे नुकसान झालेले आहे. इलेक्ट्रिक वस्तू,कपाट,सोनं,चांदी,कपडे या रुद्र्रुप धारण केलेल्या आगी मध्ये झोपडपट्टी वाशीयांचा संसाराची राख रांगोळी झीली आहे.

दामूनगरनंतरची सर्वांत मोठी आग –
कांदिवली येथील वन जमिनीरील वसलेल्या दामूनगर येथील झोपडपट्टीला ७ डिसेंबर २०१५ साली असाच प्रकारे सिलेंडरचा स्पोट होवून भीषण आग लागली होती. या आगीत ७ झोपडीधारकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २५ जण जखमी झाले होते. या आगीच्या ७ वर्षांनंतर पुन्हा अशाचप्रकारची आग जामऋषी नगरातील झोपडपट्टीला लागलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील वन जमिनीवरील झोपड्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारकडून पुनर्वसन होईल का? असा प्रश्न स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.

२०१५ साली दामू नगर मध्ये आग लागून अडीच हजार कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली होती त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व पालकमंत्री विनोद तावडे यांनी दामू नगर,भीम नगर येथील अपघात ग्रस्त कुटुंबियांच्या वस्तीला भेट दिली होती त्यावेळी.आश्वासन दिले होते २ महिन्यांमध्ये झोपडपट्टी वाशीयांचं पुनर्वसन केली जाईल परंतु तत्कालीन फडणवीस सरकार यांना अद्याप पुनर्वसनासाठी मुहूर्त मिळालेला दिसत नाही.असा आरोप स्थानिक रहिवाशी तथा सामजिक कार्यकर्ते संजय बोर्डे यांनी केला आहे.