पाडळी शिंदे येथिल उपोषणाचा दुसरा दिवस
प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव
देऊळगाव मही:-येथुन जवळच असलेल्या पाडळी शिंदे पाडळी शिंदे येथील कर्तव्यदक्ष महिला सरपंचासह ग्रामस्थाचे पुलासह शेतरस्त्याच्या मागणीसाठी दि.१४फेब्रवारी २०२३पासुन आमरण साखळी उपोषण सुरू असुन आमरण उपोषण कर्त्ये माजी उपसरपंच मुरलीधर सोनाजी जाधव यांची दुसर्या दिवशी सकाळीच तब्येत खालावल्याने त्यांना तातडीने पोलिस प्रशासन व डॉक्टर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते.त्यात आमरण उपोषण कर्त्ये माजी उपसरपंच मुरलीधर सोनाजी जाधव यांची प्रकृती खालावल्याने त्याचा छोटासा मुलगा आठ वर्षीय गहिवरल्याने उपोषण कर्त्ये जाधव हे सुद्धा गहिवरून आले त्यावेळी उपोषण मंडपातील उपस्थित महिला व पुरुष यांनाही अश्रू अनावर झाले.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर देऊळगाव राजाचे तहसीलदार शाम धनमने यांनी भेट देऊन उपोषण कर्त्यानां त्यांच्या मागणीविषयी चर्चा केली.व प्रकृतीची काळजी घेण्याची सुचना केली.व सदर रस्ते योजना बाह्य असल्याने तात्काळ निधी उपलब्ध होऊ शकत नाही.तरी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली असता उपोषण कर्त्ये आपल्या मागणीवर ठामच असुन ठोस लेखी आश्वासना शिवाय कुठल्याही सबबीवर उपोषण सोडणार असा गर्भित इशारा सरपंच पती प्रकाश शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिला.तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजाचे उपअभियंता बालाजी काबरे यांनी भेट देऊन मिसिंग लिंक पाडळी-खैरव शेतरस्याची दानपञी उपलब्ध करून देण्यात यावी.त्यानंतर सदर रस्ता, बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करुन मंजुरी नंतर काम पुर्ण करुन देण्यात येईल.तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत असलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पांदन रस्ते योजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांच्याकडे तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव व तत्सम अन्य कारणामुळे कामाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद शाळा ते माणिकराव माधव शिंदे या रस्तेचे काम करणे शक्य नसल्याने गटसमन्वयक तथा तहसीलदार देऊळगाव राजा यांना लेखी कळविल्या चे उपोषण कर्त्यानां कळविल्या चे सांगितले तथा तशा आशयाचे पत्र दिले.
उपोषणाच्या अगोदर १३फेब्रवारीला उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा यांनी सुध्दा योजना बाह्य रस्ते विकास योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत समाविष्ट करण्याबाबत कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा यांना २०१८मध्येच पञव्यवहार केला असल्याने अशा आशयाचे पत्रव्यवहार एन.एन.मेहेञे उपविभागीय अभियंता यांनी सांगितले. एकंदरीत या दोन्ही विभागांनी उपोषण कर्त्यानां पञव्यवहार व चर्चा करून सदर पुलाच्या व तीन शेत रस्याचां प्रश्न तात्काळ मार्गी लागु शकत नसल्याचे सांगितल्याने आता उपोषण कर्त्यासह पाडळी शिंदे ग्रामस्थांचे लक्ष लोकप्रतिनिधीकडे लागले असुन त्यांनी त्याचा निधी टाकुन नदीतील शेतरस्ता पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याकडे लागले आहे.