अल्पवयीन मोबाईल चोर आठवडी बाजारात सक्रिय: पोलिसांचे दुर्लक्ष
कळंब (तालुका प्रतिनिधी) स्थानिक आठवडी बाजारात दर मंगळावारला बाजारात गर्दीचा फायदा घेत अल्पवयीन मुले ग्राहकांच्या खिशातून मोबाईल व पैसे उडविल्याचे घटना घडत आहेत. प्राप्त माहितीनुसार दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असताना सायंकाळी ३ वाजता नंतर भाजीपाला घेणाऱ्या ग्राहकांची बाजारात गर्दी वाढत असते.या गर्दीचा फायदा घेत १० ते १५ वर्षा खालील मुले बाजारात या ग्राहकांच्या पहाणीवर मागेच असतात व वरच्या खिशातील मोबाईल पैसे उडवितात.अशाच प्रकारे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळच्या वेळात बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेले कळंब येथील मेडिकल दुकानदार कोठारी मेडिकलवाले महादेव महाराज, (स्वामी विवेकानंद मठवाले), चिंतामणी मंदिरातील कर्मचारी दत्ता पचकटे ,खेड्यावरील एका महीलेचा असे एकाच दिवशी सहा-सात मोबाईल चोरीला गेले आहे.यासंदर्भात रविंद्र मधुकर शिंगोटे रा. (कोठा) यांचा विवो कंपनीचा मोबाईल बाजारात खिशातून उडविल्याने त्यांनी दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. अशा ६ ते ७ लोकांचे ॲन्ड्रॉइड मोबाईल बाजारात ५० ते ६० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले आहे.आठवडी बाजारसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब,मजूरदार नागरिक येत असतात व दर आठवड्याला चोरटी मुले कुणावर ना कुणावर हात साफ करुन जातात. अशा मोबाईल चोरांना अभय कोणाचे असाही प्रश्न जनसामान्यात निर्माण होतो कळंब पोलीस मोबाईल चोरीवर आळा घालेल काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची आठवडी बाजारात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरीकांची मागणी आहे.