Home यवतमाळ दापोरा येथे स्नेहमीलन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

दापोरा येथे स्नेहमीलन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

110

वडकी/प्रती.

चिंचमंडळ केंद्रातील जि. प. प्राथ शाळा दापोरा येथे दि. 15/02/2023 ला स्नेहमीलन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
स्नेहमीलन सोहळार्तगत कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. नरेंद्र कांडुलवार ग. शि. अ. प.स. मारेगाव, अध्यक्ष म्हणून श्री. निव्वृती रूईकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दापोरा, विशेष अतिथी श्री. रामचंद्र जवादे सरपंच ग्रा. पंचायत खैरगाव (बु) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आशा कीन्नाके, सौ. विद्याताई जवादे, श्री. श्रावण करडे, श्री. अभिमान कुमरे, सूंदरलाल आत्राम, श्री. प्रमोद चौधरी, महादेव येरमे, श्री. श्रीधरराव जवादे, सोमाजी करपते,अंबादासजी गोडे, गणेश पांगुळ उपस्थित होते.
या कार्यक्रमार्तगत सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर मा. श्री. नरेंद्र कांडुलवार यांनी मार्गदर्शन केले. मान्य वारांची भाषणे झाली त्यानंतर महिला मेळावा माता-पालक पूजन कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर स्नेहभोजनाचा झाला. रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला, महिला, ग्रामस्थ, युवक, शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनराज कचरे स. शि. प्रास्ताविक श्री खेकारे सर. आभार प्रदर्शन आशीष चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यध्यापक श्री. नीमकर सर, स. शिक्षक, शा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर एकता दुर्गा मंडळ व महिला बचत गट यांनी सहकार्य केले.