Home मुंबई उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत कालही होतो, आजही सोबत आहे आणी उद्याही...

उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत कालही होतो, आजही सोबत आहे आणी उद्याही सोबत राहतील – सुभाष तळेकर ( अध्यक्ष ) मुंबई डबेवाला असोशिएशन

110

मुंबई , ( प्रतिनिधी ) सत्तासंघर्षाचा निकाल काहीही येवू द्या त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही डबेवाले, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत कालही होतो, आजही सोबत आहे आणी उद्याही सोबत राहतील !

कारण मागिल काही वर्षात उध्दव ठाकरे यांनी डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रमाणीक पणे प्रयत्न केले आहेत. डबेवाल्यांना लोकल रेल्वे स्टेशन बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड उपलब्द करून दिले आहेत. चर्नीरोड,ग्रॅटरोड,अंधेरी येथील सायकल स्टॅन्ड पुर्ण होऊन डबेवाले ते स्टॅन्ड वापरत आहेत व अनेक रेल्वे स्टेशन बाहेर सायकल स्टॅन्डचे काम प्रगती प्रथावर आहे. जसं जशी जागा उपलब्द होईल त्यांवर ते अवलंबून आहे. उध्दव ठाकरे यांचे वाढदिवसा निमित्त डबेवाल्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या आहेत त्या मुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी सायकल मोफत उपलब्द झाल्या. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्ना बाबत आघाडी सरकारच्या वतीने महत्वाच्या बैठका मंत्रालयात पार पडल्या जवळ जवळ डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा अंतीम टप्या पर्यंत पोहचला आहे लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल. डबेवाल्यांना मुंबई महानगर पालिकेतच्या वतिने वांद्रे या ठिकाणी डबेवाला भवनसाठी जागा देण्यात आली.
डबेवाल्यांच्या आरोग्य बाबत मुंबई महानगर पालिका सभागृहांने ठराव पारीत केला आहे की डबेवाल्यांच्या उपचारासाठी मुंबई महानगर पालिका रूग्णालयात विषेश कक्ष असावा असा ठराव पारीत केला आहे. लकरच या ठरावाची अंमल बजावणी होईल अशी आशा आहे. गेल्या काही वर्षात आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रामणीक प्रयत्न उध्दव ठाकरे यांचे कडून झाला आहे. तसेच मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम ठाकरे कुटुंबाने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी नाळ ठाकरे कुटुंबाशी जोडली गेली आहे. आम्ही ही मराठी आहोत म्हणुन “ मुंबई डबेवाला असोशिएशन” संघर्षाच्या काळात उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे.