यवतमाळ – गेल्या 18 वर्षापासून रक्तदानाचा सुरु झालेला प्रवास आज अर्धा शतकावर पोहचला सतत गरजूंना मदत करून त्यांना सहकार्य करणे हे दिपक यंगड यांचे परम कर्तव्य समजून त्यांनी अनेक गरजूवंताचे प्राण वाचवली…यवतमाळ, वर्धा,सेवाग्राम,सांगवी मेघे,नागपुर,अमरावती येथील दवाखान्यात पण गरजूंना रक्तदान केले…
श्री.वसंतराव नाईक रूग्णालय व महाविद्यालय यवतमाळ, येथे रक्तदान करुन दिपक यंगड यांनी अर्धे शतक पुर्ण केले, 18 वर्षापासून सतत गरजूंना रक्तदान करता करता आज 50 वेळा रक्त देऊन अर्ध शतक पूर्ण केले…
रक्तदान करा, मानवतेच्या हिताचे काम करा.
काळाचा प्रत्येक क्षण आणि रक्ताचा प्रत्येक थेंब हा अनमोल आहे… असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
रक्त आपल्या शरीरातील आवश्यक अशा घटकांपैकी एक आहे, जे शरीराला सुरळीत काम करण्यास मदत करते. रक्तदान हे गरजू लोकांनी आपले निरोगी रक्त गरजू व्यक्तींसाठी दान करण्याची कृती आहे. जास्त प्रमाणात रक्त कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून, आपण असे म्हणू शकतो की रक्तदान हे जीव वाचवण्याची कृती आहे.