Home वाशिम मंगरुळपीर शहरातील कदम कुशन दुकानासह इतर चार दुकाने आगीत बेचीराख

मंगरुळपीर शहरातील कदम कुशन दुकानासह इतर चार दुकाने आगीत बेचीराख

182

लाखोंचे नुकसान ,

(फुलचंद भगत)
वाशीम:-मंगरुळपीर शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील असलेल्या कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे दुकान जळुन खाक झाले.क्षणात आगीने रौद्र रुप धारण केल्याने बाजुची चार दुकानेही आगीत बेचिराख झाली.घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवुन परिस्थीती नियंञणात आणन्यासाठी प्रयत्न करीत होते.सदर आग विझवण्यासाठी नागरीक कशोसीने प्रयत्न करीत होते.मंगरुळपीर येथील न.प.ची अग्नीशामक गाडी ऊशीरा आल्याने आगीवर लवकर नियंञण मिळवता न आल्याने आग वाढतच जावून शेजारील दुकानेहीजळल्याची चर्चा नागरीक करीत होते.कारंजा येथील अग्निशमन यंञणेला प्राचारण करण्यात आले होते.ऊशीराने आगीवर नियंञण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला माञ तोपर्यत कदम कुशनसह शेजारील दुकानदाराचे लाखोंचे नुकसान माञ झाले.मंगरुळपीर महसुल विभाग,पोलीस विभाग,न.प.प्रशासनाने आग विझवन्यात महत्वाची भुमिका बजावली.संत गाडगेबाबा आपत्ती व बचाव पथकाचे अतुल ऊमाळे,गोपाल गीरी,लखन खुळे यांनी सदर आग विझवण्यासाठी मोलाची भुमिका बजावली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206