Home जालना होणाऱ्या बायकोवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणात आरोपीची कबुली ,

होणाऱ्या बायकोवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणात आरोपीची कबुली ,

233
  1. मी तुला मोबाईल दिला तू मला काय देणार ,?

अमीन शाह

महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. मंठा तालुक्यातील बेलोरा येथील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा खून करण्यापूर्वी संशयित सुशील पवार याने तिला मोबाईल गिफ्ट दिला होता आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाआधी ‘ शारिरीक संबंध ‘ ठेवण्याची मागणी केली मात्र तिने नकार दिल्यावर चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिच्यवर बलात्कार करून खून केल्याचे घटनेत समोर आलेले आहे .
खून केल्यानंतर तो अहमदाबाद इथे गेला होता मात्र काम न मिळाल्याने तो मुंबईकडे आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
उपलब्ध माहितीनुसार , बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) हिचा मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता आणि त्यांचा साखरपुडाही झाला होता. विवाह १७ मार्च रोजी असल्याने १८ फेब्रुवारी रोजी वधू आणि वर पक्षांकडील मंडळी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी दुसरबीड येथे गेले होते हीच संधी साधून सुशीलने नातेवाईकांना खोटे सांगून थेट बेलोरा गाव गाठले आणि तिला मोबाईल भेट दिला सोबतच तिच्यासोबत त्याने ‘ शारिरीक संबध ‘ ठेवण्यासाठी जबरदस्ती केली.
तिने नकार दिल्यावरही त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वादावादी झाली त्यावेळी त्याने तिच्या अंगावर बसून तिचा गळा दाबला आणि नंतर धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता तिचा खून केल्यावर घाई गडबळीत पळून जाताना आरोपीची दुचाकी पिठाच्या गिरणीला धडकली होती म्हणून नागरिकांना त्याचा चेहरा लक्षात होता. खून केल्यावर त्याने गुजरातला पलायन केले मात्र काम न मिळाल्याने तो मुंबईत आला अन पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिस खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली असून त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.