घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या अंबड-घनसावंगी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून हे चोरटे विचित्रच असल्याचे दिसून येत आहे.कुंभार पिंपळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री विठ्ठल मंदिर,कुंभार गल्ली परिसरात चार ते सहा चोरट्यांनी नागरिकांच्या घरात घुसून घरातील कुठल्याही वस्तूला हात न लावता प्यांटचे खिसे चाफून मिळतील तेवढे पैसे काढून घेवून कपडे तीथेच फेकून दिले.येथील,चत्रभुज आनंदे,अर्जुन राऊत,आदित्य बिलोरे यांच्या घरी चोरी झाली चोरट्यांनी खिशातील नगदी पैसे पळविले.पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी परीसरात डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेले ८ विदयुत पंप चोरीला जावून एकुण मुद्देमाल २ लाखांचा चोरीला गेल्याने शेतकरी हैराण झाले असुन याप्रकरणी शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
सध्या वडीगोद्री फिडरमध्ये दिवसाची लाईट सुरू असून त्यामुळे रात्री शेतकरी डाव्या कालव्यावर जात नसल्याने या संधीचा चोरट्यांनी फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या आठ मोटारीवर डल्ला मारला आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.त्यात उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात होत असल्याने पिकांना जास्त पाणी लागते.दिवसा पाणी दयावे कि रात्री कालव्यावर मोटारी राखण करण्यासाठी जावे लागते.रात्री शेतात पाणी दयावे कि मोटारीकडे जावे या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडल्याने शेतकरी हैराण झाले.
परिसरात सध्या डाव्या कालव्यावरुन,नदी,विहीरीतुन विदयुत पंप चोरणारी टोळी कार्यरत झाल्याने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कृषी साहित्याच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.त्यातच कृषी पंपातील तांब्याच्या वायरला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने जिल्ह्यात अनेक कृषी पंपाच्या चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
दिवसा शेतकऱ्याच्या शेतात जाऊन टेहाळणी करायची आणि रात्री चोरी करायची,असा धडाकाच या टोळ्यांनी लावला आहे.गुन्हा दाखल करताना पुरावा लागतो.मात्र अनेक शेतकऱ्याकडे बिल नसल्याकारणाने शेकऱ्यांना गुन्हा दाखल न करताच परतावे लागते.जे गुन्हे दाखल होतात त्यांचा तपास लागत नाही.येन पिकांना पाणी भरणीच्या वेळी ह्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वडीगोद्री येथील शेतकरी संभाजी अर्जुन गावडे,पांडुरंग मांगदारे,राहुल खटके,संदीप आटोळे,छत्रभुज मांगदारे,शांताबाई खटके या शेतकऱ्यांच्या ८ मोटारी चोरीला गेल्या आहे.तर राहुल खटके व पांडुरंग मांगदरे या शेतकऱ्यांच्या चार दिवसापूर्वी मोटर चोरीला गेल्यानंतर पुन्हा नवीन बसविल्या असता पुन्हा कालरात्री लोडशेडिंगचा फायदा घेऊन दुसऱ्यांदा बसविलेल्या मोटारी चोरी गेले आहे.सतत मोटारी चोरीला जात असल्याने शेतातील पिके आणि मोटारीचा खर्चाचा हिशोब जूळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.मोटार चोरी प्रकरणी संभाजी अर्जुन गावडे,पांडुरंग मांगदरे यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.