Home बीड शासकीय जिल्हा रुग्णालातील ओपीडी संपुर्ण स्टाफ सकट पूर्णवेळ चालु करावी – रुग्ण...

शासकीय जिल्हा रुग्णालातील ओपीडी संपुर्ण स्टाफ सकट पूर्णवेळ चालु करावी – रुग्ण मित्र बाळासाहेब धुरंधरे

94

दवाखान्यातील एमर्जन्सी असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांना वेळेत पोहोचण्याची सक्तीचे आदेश गरजेचे.

बीड (प्रतिनिधी) :- बीड, जिल्ह्या व शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता रुग्णांना दवाखान्याच्या अर्धवेळे मुळे आपल्या हक्काच्या दवाखान्यात मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधा या रुग्णांना ताटकळत ठेवणाऱ्या असुन या आरोग्य सुविधा वेळेत तात्काळ मिळत नसल्याने संपुर्ण दवाखाना स्टाफ यांच्या उपस्थितीत सरसकट पुर्ण वेळ चालु ठेवण्याची मागणी सध्या जनतेमधून होत आहे. सध्या बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातुन मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात असते. याचकरता गरजु रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात व रुग्णालया मधील अर्धवेळ असणारी ओपीडी (तपासणी) पूर्ण वेळ म्हणजेच सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत सर्व दवाखान्यातील स्टाफ यांच्या उपस्थितीत सरसकट दररोजची पूर्ण वेळ चालु ठेवण्यात यावी.
त्याचबरोबर गंभीर रुग्णासाठी डाॅक्टर वेळेत पोहचत नसल्याचे चित्र ही सध्या जिल्हा रुग्णालयात पहावयास मिळते आहे डाॅक्टर वेळेत पोहचले नाही तर एखाद्या रुग्णाला आपला जिव गमवावा लागतो या पेक्षा भयावह गंभीर समस्या अजुन काय असु शकते असा सध्या मोठा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. या साठी कर्तव्यदक्ष सिव्हील सर्जन यांनी कडक नियम करणे गरजेचे बनले आहे.
आज लगत जिल्हाभरातून आलेले रुग्ण हे दवाखान्याच्या चिठ्ठी काढण्यापासून ते डॉक्टरांना तपासणी करण्यापर्यंत व पुढे रक्त तपासणी असेल किंवा औषधी घेण्यासाठी मोठी रांगच- रांग या मध्येच पुढील तपासणी साठी वेळ निघुन जात असल्याने पुढिल तपासणी सोनोग्राफी, सिटीस्कॅन, रक्ताचे रिपोर्ट, एक्स-रे या सर्व प्रक्रिया व सुविधा आपल्या बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दवाखान्याचा अपुऱ्या नियोजना अभावी रुग्णांना तात्काळ सुविधा मिळत नसून यासाठी जिल्हाभरातून व दुरून आलेले ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते.
याच गंभीर समस्ये अभावी मोठा फटका बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अर्धवेळ सुट्टीमुळे गरजु रुग्णांना दररोजच बसतो आहे. त्यामुळे दवाखान्याची वेळ वाढवुन सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात यावी, त्याचबरोबर रुग्णालयातील अपुरा स्टाफ यांच्या अपुऱ्या नियोजन सर्वसामान्य व गरजू रुग्णांना शासकीय जिल्हा रुग्णालयांमध्ये आपल्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळवण्याकरता खूप मोठी एक प्रकारे कसरतच करावी लागते. यामध्ये दिव्यांग रुग्णांनाही अर्धवेळ ओपीडी दवाखान्याच्या कमी वेळे अभावी मोठी दमछाक व पळापळ होते याकरता बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सिव्हील सर्जन सुरेश साबळे साहेब यांनी या कमी वेळेच्या ओपीडी दवाखाना हा पूर्ण वेळ संपूर्ण स्टाफ सकट सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संपूर्ण आरोग्य सुविधे बरोबरच नियमीत पूर्ण वेळ दवाखाना चालू ठेवावा अशी मागणी रुग्णमित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी प्रसार माध्यमाद्वारे बीड जिल्हा चिकित्सक यांना केली आहे व लवकरच आपण महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तसेच बीड जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाद्वारे बीड जिल्हा रुग्णालयाची अवस्था, रुग्णांची होणारी गैरसोय, व रुग्णांना कमी वेळे अभावी न मिळणारी रुग्ण हक्काची आरोग्य सुविधा याबद्दल आपण निवेदना मार्फत संपूर्ण लेखाजोखा मांडणारा असल्याचे सांगितले आहे. तसेच जोपर्यंत बीड जिल्हा रुग्णालयाती अर्धवेळ ओपीडी तपासणी वेळ पूर्ण वेळ होत नाही तोपर्यंत माझी लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत मी चालूच ठेवणार असल्याचे रुग्ण मित्र रोहित उर्फ (बाळासाहेब) धुरंधरे त्यांनी प्रसार माध्यमाद्वारे कळवले आहे.